Hardik Pandya And Girlfriend Mahieka Sharma’s Viral Video भारतीय संघाचा अष्टपैल क्रिकेटर मैदानातील कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील प्रेमाच्या गोष्टीमुळे सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. मॉडेल नताशा स्टॅन्कोविक (Natasa Stankovic) पासून वेगळे झाल्यावर हार्दिक पांड्या आता फॅशन मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्माच्या प्रेमात पडला आहे. बर्थडे तिच्यासोबत साजरा करत माहिकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट दिल्यावर ही जोडी सातत्याने एकत्र दिसली. आता तर ते लिव्हइनमध्ये राहत असल्याची गोष्टही समोर येत आहे. हार्दिक पांड्या सातत्याने तिच्यासोबतचे काही क्षण शेअर करताना दिसतोय. यात आता आणखी एका खास व्हिडिओची भर पडली आहे.
तो, ती अन् रोमॅण्टिक मूड
Hardik Pandya With Mahieka Sharma
हार्दिक पांड्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात हार्दिक-माहिका जोडीमधील कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. फिल्मी स्टाईलमध्ये परफेक्ट रोमान्सची झलक दाखवणाऱ्या एका फोटोत सागरी किनारा...अन् दोघांनी एकमेकांना बिलगत मारलेली प्रेमाची मिठी ही जोडीतील खास बॉण्डिंग दाखवून देणारी आहे.
रोमान्सचा तडका, व्हिडिओ सोशल मीडियावर गाजला
याशिवाय हार्दिक पांड्याने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात हार्दिक पांड्या आपली अलिशान कार वॉश करताना दिसतो. तिथं माहिकाची एन्ट्री होते. कार धुण्यासाठी ती त्याला मदत करतेच. पण यावेळी दोघांच्यात दिसलेला रोमान्सचा तडका सोशल मीडियावर चांगलाच गाजताना दिसतोय.
घटस्फोटानंतर क्रिकेटरचं अनेकजणींसोबत नाव जोडलं गेलं, पण..
हार्दिक आणि नताशा यांच्यातील घटस्फोटनंतर हार्दिक पांड्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांड्या पासून ते अगदी ब्रिटिश मॉडेल आणि सिंगर जॅस्मीन वालिया हिच्यासोबत जोडलं गेल. IPL च्या वेळी जॅस्मीन त्याच्या अवतीभोवती असायची. पण ती गेली अन् माहिका पांड्याच्या दिलाची राणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रिकेटर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यासोबतच्या खास फोटोसह व्हिडिओ शेअर करत प्रेम करुया खुल्लम खुल्ला गाणं गाताना दिसतोय. प्रेम आणि रोमान्स पलिकडे जाऊन ही जोडी आयुष्यभरासाठी जमणार का? ते पाहण्याजोगे असेल.