Join us
Daily Top 2Weekly Top 5

पांड्या बंधुंचा शायराना अंदाज; हार्दिक-कृणाल यांना सतावतोय हा प्रश्न!

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि ट्वेंटी-20 मालिकेत संघाने 3-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 17:35 IST

Open in App

बडोदा : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि ट्वेंटी-20 मालिकेत संघाने 3-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या या दौऱ्यातील एकाही संघाचा सदस्य नाही, तर कृणालला ट्वेंटी-20 संघात स्थान मिळाले होते. त्यानं या मालिकेत 3 विकेट्स आणि 67 धावा केल्या. ट्वेंटी-20 मालिका संपवून कृणाल मायदेशी परतला आणि त्यानंतर कृणाल व हार्दिक या पांड्या बंधुंची जुगलबंदी पाहायला मिळाली. आठ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकुळ घातलेल्या 'व्हाय दिस कोलावरी डी' हे गाणं पांड्या बंधूंनी गायलं.

हार्दिक आणि कृणाल यांनी त्यांच्या मित्रांसोबत एक पार्टी आयोजित केली होती. त्यात पांड्या बंधुंनी कराओके सेशनमध्ये सहभाग घेतला. त्यात या दोघांनी कोलावरी डी हे गाण गायलं आणि दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  पाहा व्हिडीओ...

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रुणाल पांड्याभारत विरुद्ध वेस्ट इंडिज