Hardik Pandya Abuse: “पानी मांगा था ***”, हार्दिक पांड्याची घसरली जीभ; पाणी न दिल्याने वॉशिंग्टन सुंदरला दिली शिवी

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारताने दुसरी वन डे लढत जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 09:34 PM2023-01-12T21:34:40+5:302023-01-12T21:35:16+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya Abuse: India vs Sri Lanka, 2nd ODI Live: Hardik Pandya abuse washington sunder over not giving water | Hardik Pandya Abuse: “पानी मांगा था ***”, हार्दिक पांड्याची घसरली जीभ; पाणी न दिल्याने वॉशिंग्टन सुंदरला दिली शिवी

Hardik Pandya Abuse: “पानी मांगा था ***”, हार्दिक पांड्याची घसरली जीभ; पाणी न दिल्याने वॉशिंग्टन सुंदरला दिली शिवी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज दुसरा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर पार पडला. श्रीलंकेच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची साजेशी सुरुवात झाली नाही. पण, हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी डाव सावरला अन् भारताचा विजय निश्चित केला. भारताने दुसरी वन डे लढत जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. मात्र याच सामन्यादरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पाणी न दिल्याने डगआऊटमधील खेळाडूंना शिवी दिल्याचं समोर आलं आहे.

उपकर्णधार हार्दिक पांड्या सध्या भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावताना दिसतोय. तो एक उत्तम फलंदाज आहेच, पण वेळप्रसंगी तो चांगल्या गोलंदाजाहीची भूमिका बजावतो. त्यामुळे भारतीय संघासाठी तो अतिशय महत्त्वाचा खेळाडून बनला आहे. पण टी-20 मध्ये कर्णधारपद आणि वनडेमध्ये उपकर्णधारपद मिळाल्यामुळे त्याला खूप गर्व आलाय का, अशी टीका होताना दिसत आहे. यातच हार्दिकने आजच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला शिवीगाळ केली आहे.

हार्दिक पांड्याची वॉशिंग्टन सुंदरला शिवीगाळ 

श्रीलंकेच्या डावात काही षटक संपल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू आपापसात बोलण्यासाठी खेळपट्टीच्या मध्यभागी आले होते. यावेळी हार्दिकनं अंपायरला बॉल दिल्यानंतर पुढच्या गोलंदाजाची वाट पाहत होता. यावेळी हार्दिकने डगआऊटमध्ये बसलेल्या वॉशिंग्टनला शिवीगाळ केली. स्टंप माईकमध्ये त्याचा आवाज रेकॉर्ड झाला. शेवटच्या षटकात पाणी न मिळाल्याने संतापलेल्या हार्दिकने स्टंप माइकमध्ये पाणी मागितले. “मैने पानी मांगा था****” असे म्हणत त्याला शिवी दिली. यावर नेटकरी भडकले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू लागले. 
 

Web Title: Hardik Pandya Abuse: India vs Sri Lanka, 2nd ODI Live: Hardik Pandya abuse washington sunder over not giving water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.