Join us

हरभजनने घेतली युवराजची फिरकी... ट्विटवर उडाली धमाल

आता तर मैदानाबाहेरही या दोघांमध्ये एक गमतीशीर किस्सा घडला. यावेळी हरभजनने युवराजची चांगलीच फिरकी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 20:12 IST

Open in App
ठळक मुद्देहरभजनला यावेळी युवराजची मस्करी करण्याचा मोह आवरला नाही.

मुंबई : हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांच्यामधली दोस्ती सुपरिचित अशीच. कारण दोघेही पंजाबकडून रणजी क्रिकेट खेळायचे. त्यामुळे या दोघांची मैत्री घनिष्ठ अशीच आहे. त्यामुळे या दोघांमध्ये मैदानातही हास्यविनोद सुरु असतात. आता तर मैदानाबाहेरही या दोघांमध्ये एक गमतीशीर किस्सा घडला. यावेळी हरभजनने युवराजची चांगलीच फिरकी घेतली.

युवराज सध्या मुंबईतील वांद्रे परिसरात राहत आहे. आज मुंबईमध्ये काही भागांमध्ये वीज नव्हती. त्यावेळी युवराजने एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये युवराजने लिहिले होते की, " वांद्रे परिसरात वीज गायब झाली आहे. गेल्या तासाभरापासून वीज पुरवठा खंडीत आहे. हा वीरपुरवठा पुन्हा पुर्ववत होणार तरी कधी ?" तसं पाहायला गेलं तर हे एक सामन्य ट्विट होतं. पण हरभजनला यावेळी युवराजची मस्करी करण्याचा मोह आवरला नाही.

युवराजच्या ट्विटवर हरभजनने लिहिले आहे की, " युवराज जर वीज बिल वेळेवर भरलं तर लाईट जात नाही. " हरभजनच्या या ट्विटवर 8500 लोकांनी लाईक केले आहे, तर 550 लोकांनी ते रिट्विट केले आहे.

टॅग्स :हरभजन सिंगयुवराज सिंग