Join us

हरभजनने पोलीसाच्या कानाखली मारली, व्हिडीओ झाला वायरल

सध्याच्या घडीला हरभजनचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 19:50 IST

Open in App

मुंबई : हरभजन सिंग म्हटले की त्याच्या काही गोष्टी कायमच्या लक्षात राहतात. ऑस्ट्रेलियामध्ये झालेले मंकीगेट आणि आयपीएलमध्ये एस. श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावल्याचे प्रकरण कोणीच विसरू शकत नाही. हरभजनने एका व्यक्तीच्या अशीच कानाखाली मारली असून त्या व्यक्तीने पळ काढल्याचे पाहायला मिळाले.

सध्याच्या घडीला हरभजनचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हरभजनने एका व्यक्तीच्या कानाखाली मारल्याचे पाहायला मिळत आहे. हरभजनने कानाखाली मारल्या ती व्यक्ती थेट खाली पडते आणि तिथून पळ काढत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हरभजन हा WWE चा सुपरस्टार दी ग्रेट खलीच्या अकादमीमध्ये गेला होता. ही अकादमील जालंधर येथे आहे. हरभजनने ही अकादमी पाहिली आणि त्यानंतर त्याला रिंगमध्ये आणण्यात आले. त्यावेळी पोलीसांच्या वेशात एक व्यक्ती हरभजनपुढे आला. हरभजनला तो मारण्याच्या तयारीत होता, असे दिसत होते. त्यावेळी हरभजनने त्याच्या कानाखाली खेचली आणि त्या व्यक्तीने तिथून पळ काढल्याचे पाहायला मिळाले.

हा पाहा खास व्हिडीओ

टॅग्स :हरभजन सिंगडब्लू डब्लू ई