अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट

Harbhajan Singh Salute Vaibhav Sooryavanshi: मुंबई आणि राजस्थान यांच्यातील लाईव्ह सामन्यात हरभजन सिंहने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला सलाम ठोकला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:44 IST2026-04-08T15:43:19+5:302026-04-08T15:44:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Harbhajan Singh Gives Salute To Vaibhav Sooryavanshi, Yashasvi Jaiswal During Commentary After Guwahati Show Against MI | अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट

अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट

मुंबई: आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. अवघ्या १५ वर्षांच्या या फलंदाजाने आपल्या बॅटिंगने क्रिकेट विश्वाला थक्क केले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या सामन्यात वैभवने जगातील सर्वात घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध जे धाडस दाखवले, ते पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह भारावून गेला. त्याने लाईव्ह सामन्यात समालोचकादरम्यान त्याला सॅल्यूट केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर मोठे फलंदाज सावध पवित्रा घेतात, तिथे १५ वर्षांच्या वैभवने वेगळाच अवतार धारण केला. डावाच्या सुरुवातीलाच बुमराहच्या पहिल्या चेंडूवर वैभवने गगनभेदी षटकार ठोकला. अनकॅप्ड असूनही अनुभवी गोलंदाजाचा कोणताही दबाव न घेता त्याने अवघ्या १४ चेंडूत ३९ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने ५ षटकार आणि १ चौकार लगावला.

पावसामुळे हा सामना कमी षटकांचा खेळवण्यात आला. राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी मुंबईच्या गोलंदाजीची पिसे काढली. यशस्वी जैस्वालने ३२ चेंडूत नाबाद ७७ (१० चौकार, ४ षटकार) धावा केल्या. तर, वैभव सूर्यवंशीने २७८.५७ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. या दोघांनी मिळून मुंबईच्या गोलंदाजांना मैदानावर सळो की पळो करून सोडले. या जोडीच्या आक्रमक खेळापुढे मुंबईचा बचाव पूर्णपणे हतबल दिसला.

हरभजन सिंहकडून सॅल्यूट

वैभवचा खेळ पाहून भारताचा माजी फिरकीपटू आणि समालोचक हरभजन सिंह भारावून गेला. समालोचन करत असताना हरभजनने चक्क उभे राहून वैभवला सॅल्यूट केला. तो म्हणाला की, "अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जर जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध अशी फलंदाजी करत असेल, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. वैभव आणि यशस्वी, तुम्हा दोघांनाही माझा सलाम. तुम्ही कमाल केली आहे," अशा शब्दांत हरभजनने त्यांचे कौतुक केले.  याआधीही हरभजनने जयस्वाल- सूर्यवंशी या जोडीची तुलना ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध ॲडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन या जोडीशी केली होती.

Web Title : 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी ने दुनिया को चौंकाया; मुंबई-राजस्थान मैच में भज्जी का सलाम।

Web Summary : 15 वर्षीय युवा वैभव सूर्यवंशी ने मुंबई इंडियंस के खिलाफ निडर बल्लेबाजी से प्रभावित किया, बुमराह को छक्का जड़ा। उनके 14 गेंदों में 39 रन और जायसवाल के 77 रनों ने राजस्थान को जीत दिलाई। हरभजन सिंह ने सूर्यवंशी की प्रतिभा को सलाम किया, उनकी साझेदारी की तुलना गिलक्रिस्ट और हेडन से की।

Web Title : 15-year-old Vaibhav Suryavanshi stuns world; Bhajji salutes in Mumbai-Rajasthan match.

Web Summary : Young Vaibhav Suryavanshi, 15, impressed with his fearless batting against Mumbai Indians, hitting a six off Bumrah. His 39 runs off 14 balls and Jaiswal's 77 led Rajasthan to victory. Harbhajan Singh saluted Suryavanshi's talent, comparing their partnership to Gilchrist and Hayden.