Join us

आफ्रिदीचं कौतुक पण, भारतातील 'त्या' लोकांसाठी हासडली शिवी; हरभजन सिंगला का आलाय राग? 

भज्जीनं सोशल मीडियावर तो व्हिडीओ शेअर केला आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 15:52 IST

Open in App

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग सोशल मीडियावर भारतीयांच्या वागण्यावर तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली आहे. कोरोना व्हायरलच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. तरीही काही हुल्लडबाज रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना आवरण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. पण, अनेक ठिकाणी हे टवाळखोर पोलिसांनाही दाद देत नसल्याचे पाहायला मिळत आहे. वसई-विरार येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर मोटारबाईक चढवण्याची घटना ताजी आहे. बीडमध्येही पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. असाच एक पोलिसांना मारहाण करण्याचा व्हिडीओ शेअर करून भज्जीनं त्या लोकांना शिवी हासडली आहे.

भज्जीनं सोशल मीडियावर तो व्हिडीओ शेअर केला आणि लिहीले की,''आपल्याला पोलिसांप्रती असलेली मानसिकता बदलायला हवी. आपलं आयुष्य वाचवण्यासाठी ते स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत, हे विसरू नका. त्यांचेही कुटुंब आहे, परंतु देशासाठी ते कर्तव्य बजावत आहेत. लोकं का घरी थांबत नाही. मुर्खपणा सोडा...'' चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजानं दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीचं कौतुक केलं होतं. कोरोनामुळे पाकिस्तानातही लॉकडाऊन परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील गरजू कुटुंबांना आफ्रिदी जीवनाश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहे. आफ्रिदीच्या या समाजसेवेचं भज्जीनं कौतुक केलं. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मोठ्या मनाचा माणूस; दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर अन् त्याच्या पत्नीची कोट्यवधींची मदत 

Shocking : आफ्रिकेच्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

क्रीडा विश्व धावलं मदतीला, पण क्रिकेटचा देव अन् कॅप्टन कोहली करताहेत फक्त आवाहन!

श्रीलंका, बांगलादेश अन् आता पाकिस्तान क्रिकेट मंडळानंही दिला मदतीचा हात; BCCI पुढाकार कधी घेणार?

Video : शोएब अख्तर देतोय कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बाबा रामदेव यांच्या टिप्स

ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहरभजन सिंगशाहिद अफ्रिदी