फिरकीपटू हरभजन सिंग खरंच चुकला की, त्याची कमेंट चुकीच्या अर्थानं फिरवली गेली?

जोफ्रा आर्चरसंदर्भात हरभजन नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 18:24 IST2025-03-24T18:19:06+5:302025-03-24T18:24:51+5:30

whatsapp join usJoin us
Harbhajan Singh compared Jofra Archer To London's Black Taxis While Commentating On His Bowling Figures During SRH vs RR In Hyderabad | फिरकीपटू हरभजन सिंग खरंच चुकला की, त्याची कमेंट चुकीच्या अर्थानं फिरवली गेली?

फिरकीपटू हरभजन सिंग खरंच चुकला की, त्याची कमेंट चुकीच्या अर्थानं फिरवली गेली?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग सध्या आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसत आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामातील सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलंदाजी करताना एका कमेंटमुळे तो चांगलाच फसला. माजी क्रिकेटपटूनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या जोफ्रा आर्चरसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे तो वादात सापडल्याचे पाहायला मिळाले. इथं जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला? त्याची कमेंट खरंच वादग्रस्त होती की, लोकांनी चुकीचा अर्थ घेऊन त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला? त्याची कमेंट वादग्रस्त ठरण्यामागंच कारण काय?

सोशल मीडियाच्या जमान्यात एखादी गोष्ट अगदी वाऱ्यासारखी पसरते. एवढेच नाही तर वेगवेगळे अर्थ काढून नेटकरी त्यावर व्यक्तही होऊ लागतात. हरभजन सिंगच्या केलेल्या कमेंट्सनंतरही तेच घडलं. जोफ्रा आर्चरची धुलाई झाल्यावर त्याने इंग्लंडच्या या गोलंदाजाचे वर्णन करताना इंग्लंडमधील 'काळ्या टॅक्सी'चा दाखला दिला. त्याची ही कमेंट वर्णभेदी असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. अनेकांनी हरभजन सिंगने याबद्दल माफी मागायला हवी, असेही म्हटले आहे.

IPL 2025 SRH vs RR : सेंच्युरीशिवाय इशान किशनच्या 'फ्लाइंग किस' सेलिब्रेशनची चर्चा
 

हरभजनला संदर्भ दिला वेगळ्या अर्थान, पण.. 

सनरायझर्स हैदराबादच्या डावातील १८ व्या षटकात हेन्री क्लासन याने आर्चरच्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर आक्रमक फटकेबाजी करत चेंडू सीमारेषेबाहेर मारले. यावेळी आर्चरच्या महागड्या गोलंदाजीची तुलना करताना भज्जीनं इंग्लंडमधील काळ्या रंगाच्या टॅक्सीचा उल्लेख केला. इंग्लंडमधील काळ्या टॅक्सीचे मीटर जसे जलदगतीनं धावते त्याच प्रमाणे जोफ्रा साहेबांनी स्पेल टाकलाय असे तो म्हणाला. भज्जीची कमेंट दोन महागड्या गोष्टींचा संदर्भ देणारी होती. पण जोफ्रा आर्चर हा कृष्णवर्णीय असल्यामुळे अनेकांना हरभजनच्या कमेंटमधील 'ब्लॅक टॅक्सी' हा शब्द खटकला. त्याची कमेंट वर्णभेदी असल्याचे चर्चा रंगू लागली. 

Web Title: Harbhajan Singh compared Jofra Archer To London's Black Taxis While Commentating On His Bowling Figures During SRH vs RR In Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.