Join us  

कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर रोहित शर्मा MI जर्सीत प्रथमच दिसला; लैय भारी Video 

पाचवेळचा आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवून आता इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ साठी मैदानावर उतरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:46 AM

Open in App

Indian Premier Leauge 2024  ( Marathi News ) :  पाचवेळचा आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवून आता इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ साठी मैदानावर उतरला आहे. हार्दिक पांड्यालामुंबई इंडियन्सने कर्णधार बनवल्यानंतर रोहितच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या होत्या. मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्या एका मुलाखतीवर रोहितची पत्नी रितिका हिने नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रियाही दिली होती. त्यामुळे रोहित MI कॅम्पमध्ये केव्हा दाखल होतो, याची चाहत्यांना उत्सुकता होती. मुंबई इंडियन्सनेही आपल्या माजी कर्णधाराच्या स्वागतासाठी भारी व्हिडीओ तयार केला.

कर्णधाराची अट ठेवून Mumbai Indians मध्ये परतलास का? हार्दिक पांड्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला 

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२० मध्ये आयपीएल जेतेपद पटकावले. पण, २०२१ व २०२२ मध्ये त्यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला, तर २०२३ मध्ये ते प्ले ऑफमधून बाहेर पडले. त्यामुळे या वर्षी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला फ्रँचायझीने ट्रेड विंडोतून आपल्या ताफ्यात पुन्हा आणले आणि कर्णधारपद दिले. पण, याने रोहित नाराज झाला नाही तर तो आता दडपणाशिवाय फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे.  

 काल मुंबई इंडियन्सने, वोह आ गया, रो आ गया... असा एक व्हिडीओ पोस्ट करून रोहितचे स्वागत केले. त्यात दोन मुलांचा संवाद दाखवला आहे.  

मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद

मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक     

  • २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  • १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  • ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई 
टॅग्स :आयपीएल २०२४रोहित शर्माहार्दिक पांड्यामुंबई इंडियन्स