#HappyBirthdayVirat 'विरुष्का' सेलिब्रेशनसाठी पोहोचले हरिद्वारच्या आश्रमात 

#HappyBirthdayVirat भारतीय संघाचा कर्णधार सध्या विश्रांतीवर आहे. त्यामुळे तो संपूर्ण वेळ पत्नी अनुष्कासह घालवत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 08:41 IST2018-11-05T08:41:33+5:302018-11-05T08:41:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
#HappyBirthdayVirat 'Viruska' reached for Harishwar's ashram | #HappyBirthdayVirat 'विरुष्का' सेलिब्रेशनसाठी पोहोचले हरिद्वारच्या आश्रमात 

#HappyBirthdayVirat 'विरुष्का' सेलिब्रेशनसाठी पोहोचले हरिद्वारच्या आश्रमात 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार सध्या विश्रांतीवर आहे. त्यामुळे तो संपूर्ण वेळ पत्नी अनुष्काला देत आहे. आज विराट आपला ३० वा वाढदिवस साजरा करत आहे आणि यावेळी भारतीय संघातील सहकारी नव्हे तर अनुष्का त्याच्या सोबत आहे. या खास क्षणाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हे कपल हरिद्वारमध्ये दाखल झाले आहे. 

कोहली आणि अनुष्का शनिवारी रात्री देहरादून येथील जॉली ग्रांट विमानतळावर उतरले आणि तेथून ते नरेंद्र नगर येथील हॉटेल आनंद येथे उतरले. ७ नोव्हेंबरपर्यंत विरुष्का हरिद्वार येथे मुक्कामी आहे. सुत्रांच्या माहितीनुसार विरुष्काने येथे रिव्हर राफ्टिंग आणि कॅम्पिंगपण केले. 

आज कोहली आपला ३०वा वाढदिवस साजरा करणार आहे. या शुभ दिवशी तो येथील अनंत धाम आत्मबोध आश्रमालाही भेट देणार आहे. अनुष्काच्या कुटुंबियांचे आध्यात्मिक गुरू महाराज अनंत बाबा यांचे ते आश्रम आहे.



 

Web Title: #HappyBirthdayVirat 'Viruska' reached for Harishwar's ashram