#HappyBirthdayVirat : वाढदिवसानिमित्त विराट कोहलीची सुरेख रांगोळी

महाजन हे एम.डी. डेढिया इंग्लीश स्कूल येथे कलाशिक्षकांचे काम करतात. विराट कोहलीची आक्रमक शैली त्यांना खूप आवडते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 20:13 IST2018-11-05T20:09:55+5:302018-11-05T20:13:47+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
#HappyBirthdayVirat: Virat Kohli's beautiful rangoli on birthday | #HappyBirthdayVirat : वाढदिवसानिमित्त विराट कोहलीची सुरेख रांगोळी

#HappyBirthdayVirat : वाढदिवसानिमित्त विराट कोहलीची सुरेख रांगोळी

ठळक मुद्देरविवारी दुपारी ४ वाजता त्यांनी रांगोळी काढण्यास सुरूवात केली. सुमारे पाच तासात त्यांनी ही रांगोळी रेखाटली. 

कल्याण : क्रिकेटपटू विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त कल्याणमधील कलाशिक्षक यश महाजन यांनी त्यांची ५ बाय १५ फूटाची रांगोळी साकारली आहे. महाजन यांनी रांगोळीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

महाजन यांनी वायले क्रिकेट मैदानात ही रांगोळी साकारली आहे. रविवारी दुपारी ४ वाजता त्यांनी रांगोळी काढण्यास सुरूवात केली. सुमारे पाच तासात त्यांनी ही रांगोळी रेखाटली.

ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना १८ ते २० किलो रांगोळी लागली.

महाजन हे एम.डी. डेढिया इंग्लीश स्कूल येथे कलाशिक्षकांचे काम करतात. विराट कोहलीची आक्रमक शैली त्यांना खूप आवडते. 


कोहलीची पाकिस्तानविरुद्धची 180 धावांची खेळी महाजन यांना खूप भावली.

Web Title: #HappyBirthdayVirat: Virat Kohli's beautiful rangoli on birthday