Join us

#HappyBirthdayVirat अनुष्काने विराटला असं केलं विश, मानले देवाचे आभार!

#HappyBirthdayVirat भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 12:09 IST

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी कोणत्याही दौऱ्यावर नसल्यामुळे विराटला पत्नी अनुष्कासह वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली आहे. अनुष्कानेही विराटला सर्वात आधी विश करण्याची संधी गमावली नाही. तिने विराटला शुभेच्छा दिल्या आणि देवाचे आभार मानले. तिने विराटसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले की,''विराटला या जगात आणल्याबद्दल देवा तुझे आभार.''  लग्नानंतरचा विराटचा पहिलाच वाढदिवस साजरा करण्यासाठी विरुष्का हरिद्वारमध्ये दाखल झाले आहे. कोहली आणि अनुष्का शनिवारी रात्री देहरादून येथील जॉली ग्रांट विमानतळावर उतरले आणि तेथून ते नरेंद्र नगर येथील हॉटेल आनंद येथे उतरले. ७ नोव्हेंबरपर्यंत विरुष्का हरिद्वार येथे मुक्कामी आहे. त्यांनी येथील अनंत धाम आत्मबोध आश्रमालाही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. अनुष्काच्या कुटुंबियांचे आध्यात्मिक गुरू महाराज अनंत बाबा यांचे ते आश्रम आहे. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा