#HappyBirthdayYuvi : 'सिक्सर किंग' युवराज साजरा करतोय ३७वा वाढदिवस

आतापर्यंत चाहत्यांना खेळाचा अवीट आनंद देणाऱ्या युवराजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 12:59 IST2018-12-12T12:57:49+5:302018-12-12T12:59:28+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
#HappyBirthday Yuvi: 'Sixty King' Yuvraj singh Celebrating 37th birthday | #HappyBirthdayYuvi : 'सिक्सर किंग' युवराज साजरा करतोय ३७वा वाढदिवस

#HappyBirthdayYuvi : 'सिक्सर किंग' युवराज साजरा करतोय ३७वा वाढदिवस

ठळक मुद्देयुवराज म्हटलं तर साऱ्यांना आठवतात ते त्याचे सहा चेंडूंतले सहा षटकार. विश्वविजयामध्ये दिलेले भरीव योगदान.कॅन्सरसारख्या दुर्दर आजारावर मात करून त्याने क्रिकेटच्या मैदानात केलेले पुनरागमन.

मुंबई : 'सिक्सर किंग' या नावाने क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्ध असलेला युवराज सिंग आज आपला ३७वा वाढदिवस साजरा करतो आहे. आतापर्यंत चाहत्यांना खेळाचा अवीट आनंद देणाऱ्या युवराजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

युवराजने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच साऱ्यांची मने जिंकली होती. त्यानंतर एक धडाकेबाज फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक, अशी त्याची क्रिकेट जगतामध्ये ओळख होती. युवराज म्हटलं तर साऱ्यांना आठवतात ते त्याचे सहा चेंडूंतले सहा षटकार. विश्वविजयामध्ये दिलेले भरीव योगदान. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या दुर्दर आजारावर मात करून त्याने क्रिकेटच्या मैदानात केलेले पुनरागमन. अरे ला कारे, म्हणणारा आणि मित्रांना जीव लावणाऱ्या युवराजचे चाहते वाढदिवसानिमित्त त्याचे अभिष्टचिंतन करत आहेत. बीसीसीआयनेही युवराजला व्हिडीओच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत.


 



 



 

Web Title: #HappyBirthday Yuvi: 'Sixty King' Yuvraj singh Celebrating 37th birthday