Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅप्पी रिटायरमेंट भाई... पंतच्या कमेंटवर जड्डूचं स्पष्टीकरण, म्हणाला...

रिषभ पंतची कमेंट अन् त्यावर जड्डूनं दिलेला रिप्लाय ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:16 IST

Open in App

इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या लढती आधी भारतीय संघातील खेळाडूंनी खास सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. सेलिब्रेशन माहोलमध्ये भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार रिषभ पंत याने संघातील अनुभवी खेळाडू  रवींद्र जडेजाला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. रिषभ पंतची कमेंट अन् त्यावर जड्डूनं दिलेला रिप्लाय ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

.. अन् पंतनं निवृत्तीबद्दल जड्डूला दिल्या  शुभेच्छा

टीम इंडियाने २०२४ च्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून एक वर्षे झाले. मागच्या वर्षी २९ जूनला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप  स्पर्धा जिंकली होती. या वर्षपूर्तीचं संघातील खेळाडूनी केक कापून सेलिब्रेशन केले. यावेळी रिषभ पंत याने रवींद्र जडेजाची फिरकी घेतली. हॅप्पी रिटायरमेंट जड्डू भाई...असं म्हणत पंत अन् बुमराह जड्डूला केक भरवताना दिसून आले. 

'चायनामन' खरंच टीम इंडियासाठी फायद्याचा ठरु शकतो का? इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड भारी, पण...

हॅप्पी रिटायरमेंट...  जड्डूनं दिला असा रिप्लाय

फिल्डवर असो किंवा फिल्ड बाहेर रिषभ पंत  आपल्या खास शैलीतील 'बोलंदाजी'सह लक्षवेधी ठरताना दिसते. टीम इंडियाच्या सेलिब्रेशन पार्टीत देखील ही गोष्ट पाहायला मिळाली. पंत म्हणाला की, हॅप्पी रिटायरमेंट जड्डू भाई... यावर जड्डूनं लगेच मी फक्त क्रिकेटच्या एका प्रकारातून निवृत्ती घेतलीये, असे म्हणत दोन प्रकारात अजूनही खेळत असल्याचे स्पष्ट केले.  २०२४ च्या हंगामातील वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जड्डूनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळेच पंतनं निवृत्ती घेऊन वर्ष झाले असं म्हणत जड्डूला शुभेच्छा दिल्या. 

इथं पाहा टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ

बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंनी इंग्लंडमध्ये केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे.  कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि यशस्वी जैस्वालसह अन्य प्रमुख खेळाडूंची झलक या व्हिडिओमध्ये दिसून येते. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मालिकावीर ठरलेल्या जसप्रीत बुमराहनं केक कापल्याचेही दिसून येते.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतरवींद्र जडेजाव्हायरल व्हिडिओ