Join us  

Happy Birthday MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीचे हे ७ निर्णय, ज्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींना रोखावा लागला श्वास, Video  

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज ४० वर्षांचा झाला. चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराचा आज वाढदिवस आहे आणि सोशल मीडियावर #MSDhoni #Happy birthdayMS Dhoni हे ट्रेंड जोरदार सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 1:00 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज ४० वर्षांचा झाला. चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराचा आज वाढदिवस आहे आणि सोशल मीडियावर #MSDhoni #Happy birthdayMS Dhoni हे ट्रेंड जोरदार सुरू आहे. १५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित धोनीनं २००७ साली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११मध्ये वन डे वर्ल्ड कप आणि २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा धोनी हा जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे. जागतिक क्रिकेट त्याला कॅप्टन कूल म्हणून ओळखतो आणि त्याची साक्ष देणारा व्हिडीओ आयसीसीनं पोस्ट केला आहे. धोनीनं त्याच्या कारकिर्दीत घेतलेल्या ७ आश्चर्यकारक निर्णयांनी चाहत्यांना अक्षरशः श्वास रोखावा लागला होता...

२००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची फायनल भारतानं पहिल्या वहिल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर नाव कोरले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या टीम इंडियानं जेतेपदाच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात एक विकेट होती. ३७ धावा करणारा मिसबाह-उल-हक मैदानावर होता. अशात धोनीनं अनुभवी हरभजन सिंग याच्याएवजी जोगिंदर शर्माच्या हाती चेंडू दिला. त्याच्या या निर्णयानं सर्वांना आश्चर्य वाटले, पण या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिसबाह उल हकनं शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं पॅडल स्वीप करणारा फटका मारला अन् चेंडू सरश एस श्रीसंथच्या हाती विसावला. भारतानं ५ धावांनी हा सामना जिंकला.

२००८ची सीबी सीरिज  २००८मध्ये धोनीनं ऑस्ट्रेलिया, श्रीलंका यांच्याविरुद्ध खेळलेल्या तिरंगी मालिकेत माजी कर्णधार सौरव गांगुली व राहुल द्रविड यांना संघातून बाहेर बसवले होते. क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी धोनीनं हा निर्णय घेतला होता आणि त्याच्यावर टीकाही झाली होती. पण, या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षण व तंदुरुस्ती याकडे खेळाडूही लक्ष देऊ लागले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं ही सीबी मालिकाही जिंकली. टीम इंडिया प्रथमच ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरली.

 २०११ चा वन डे वर्ल्ड कप२०११च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर विजय मिळवला होता. भारताला विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य मिळाले होते आणि टीम इंडियाचे तीन फलंदाज ११४ धावांवर माघारी परतले होते. तेव्हा चौथ्या क्रमांकावर युवराज सिंग येणं अपेक्षित होतं, परंतु धोनी मैदानावर आला. मुथय्या मुरलीधरन गोलंदाजी करत असल्यामुळे धोनीनं हा निर्णय घेतला आणि त्यानं नाबाद ९१ धावांची खेळी करताना टीम इंडियाला २८ वर्षांनंतर वन डे वर्ल्ड कप जिंकून दिला. नुवान कुलसेकराला मारलेला षटकार हा आजही चाहत्यांच्या चांगलाच लक्षात आहे.  

२०१२ची सीबी सीरिज २०१२च्या सीबी तिरंगी मालिकेत धोनीनं सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांना प्लेईंग ११मध्येघ घेण्यासाठी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांना रोटेट केले होते. फॅन्सनी त्याच्यावर टीका केली. धोनीचा हा निर्णय संघाच्या हिताचा ठरला नाही आणि संघाला फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. 

२०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित शर्माला पाठवले सलामीलामहेंद्रसिंग धोनीनं २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्माला सलामीला खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला. रोहित तेव्हा फॉर्माशी झगडत होता, परंतु त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. शिखर धवन व रोहित या जोडीनं स्पर्धेत धम्माल उडवली. रोहितनं पाच सामन्यांत १७७ धावा केल्या आणि त्यात दोन अर्धशतकं होती. धोनीचा हा निर्णय संघासाठी मास्टर स्ट्रोक ठरला. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच जिंकली नाही, तर भारताला मर्यादित षटकांच्या सामन्यात नवा ओपनर मिळाला.

कसोटी व वन डेतून अचानक सन्यासधोनीनं डिसेंबर २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता आणि मेलबर्न कसोटीचा निकाल अनिर्णीत लागल्यानंतर धोनीनं लगेच निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर तीन वर्षानंतर धोनीनं वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेट संघाचे नेतृत्वही अचानक सोडले.  २०२० अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती  २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून हार मानावी लागली होती. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला अन् १५ ऑगस्ट २०२०मध्ये धोनीनं अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघ