चिंता नसावी, तू IPL 2023 साठी तंदुरुस्त होशील! Jasprit Bumrah वर नेटिझन्स खवळले, अतरंगी मीम्स व्हायरल केले

Jasprit Bumrah ruled out of T20 World Cup 2022 : भारतीय चाहत्यांना जे नको हवं होतं तेच झालं... प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे BCCI ने सोमवारी जाहीर केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 15:26 IST2022-10-04T15:25:22+5:302022-10-04T15:26:42+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
'Gutted' tweets Jasprit Bumrah, he Ruled Out Of T20 World Cup. Here's How The World Reacted, see memes | चिंता नसावी, तू IPL 2023 साठी तंदुरुस्त होशील! Jasprit Bumrah वर नेटिझन्स खवळले, अतरंगी मीम्स व्हायरल केले

चिंता नसावी, तू IPL 2023 साठी तंदुरुस्त होशील! Jasprit Bumrah वर नेटिझन्स खवळले, अतरंगी मीम्स व्हायरल केले

Jasprit Bumrah ruled out of T20 World Cup 2022 : भारतीय चाहत्यांना जे नको हवं होतं तेच झालं... प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे BCCI ने सोमवारी जाहीर केले. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला बसलेला हा दुसरा आणि सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल. याआधी अष्टपैलू रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बुमराहने पुनरागमन केले खरे, परंतु त्याच्या पाठीच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढले आणि त्याला माघार घ्यावी लागली. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बुमराह खेळेल अशी आशा होती, परंतु BCCI च्या वैद्यकीय टीमने अहवाल दिला अन् धक्का बसला.

आज बुमराहने भावनिक ट्विट केले. त्याने लिहिले की,''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळू न शकल्याने दुःखी झालो आहे. या कठीण काळात चाहत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छा व समर्थनासाठी आभार मानतो. जसजसा बरा होईन, तसतसे मी ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाच्या मोहिमेला सपोर्ट करण्यासाठी उपलब्ध असेन.'' बुमराहची ही भावनिक साद अनेकांना पटलेली नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल केले. अनेकांनी तर आकडेच मांडून बुमराह आयपीएलला प्राधान्य देतो, असा आरोप केला.

cr२०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर बुमराहने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी ६० पैकी ५९ सामने खेळले, तर भारतासाठी ७० पैकी केवळ १६ सामने खेळल्याची आकडेवारी एका दैनिकाने प्रसिद्ध केली. 





Web Title: 'Gutted' tweets Jasprit Bumrah, he Ruled Out Of T20 World Cup. Here's How The World Reacted, see memes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.