Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: गुजरात टायटन्सचा मास्टरस्ट्रोक! CSK चा माजी धडाकेबाज ओपनर गिलच्या टीमला देणार बॅटिंगचे धडे

फलंदाजीचा दर्जा सर्वोत्तम करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:18 IST

Open in App

Gujarat Titans Appointed  Matthew Hayden As Batting Coach  IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) च्या आगामी हंगामासाठी शुभमन गिलच्यागुजरात टायटन्स संघाने मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन याची फ्रँचायझी संघाने फलंदाजी प्रशिक्षकाच्या रुपात नियुक्ती केली आहे. मॅथ्यू हेडन यांनी २००८ ते २०१० या कालावधीत चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनधीत्व केले आहे.  २००९ मध्ये ऑरेंज कॅप पटवणारा ऑस्ट्रेलियन दिग्गज निवृत्तीनंतर समालोचकाच्या रुपात IPL शी कनेक्ट असल्याचे पाहायला मिळाले होते. आता हा दिग्गज प्रशिक्षकाच्या रुपात गुजरातच्या संघाला फलंदाजीचे धडे देताना दिसणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गिलच्या नेतृत्वाला अनुभवाची जोड

गत हंगामात गुजरात टायटन्सचा संघ (Gujarat Titans) तिसऱ्या स्थानावर राहिला. एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. हार्दिक पांड्याने पदार्पणाच्या हंगामात संघाला जेतेपद मिळवून देत इतिहास रचल्यावर आता या संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. तो सध्याच्या घडीला वनडे आणि कसोटीत टीम इंडियाचाही कॅप्टन आहे. त्यात आता मॅथ्यू हेडन या दिग्गजाच्या अनुभवाची भर पडली आहे.  

आयसीसीच्या सहापट! BCCI कडून विश्वविजेत्या संघाला १३१ कोटींचे बक्षीस जाहीर; कोणाला किती मिळणार? जाणून घ्या

फलंदाजीचा दर्जा सर्वोत्तम करण्यावर भरगुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी (Vikram Solanki) म्हणाले आहेत की, हेडन यांचा अनुभव आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची क्षमता संघाची फलंदाजी अधिक मजबूत होईल. फ्रँचायझी दीर्घकालीन यशासाठी क्रिकेटिंग संरचना अधिक मजबूत करण्यावर भर देत आहे.हेडन यांनीही गुजरात टायटन्ससोबत काम करण्याबद्दल उत्साह व्यक्त केला. चांगली फलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला दबावात आणते पण फलंदाजीतील सर्वोत्तम दर्जा सामना जिंकून देते. गुजरात टायटन्सच्या संघाला त्याच स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे हेडन यांनी म्हटले आहे.

 तगडा अनुभव अन् आक्रमक फलंदाजी शैली ही खासियत

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हेडन यांनी ऑस्ट्रेलियासाठी २७३ सामने खेळले आणि १५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. ते  क्रिकेट जगतातील सर्वात प्रभावी सलामीवीरांपैकी एक होते. अनेक ICC स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या यशात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची आक्रमक पण तांत्रिकदृष्ट्या मजबूत फलंदाजी शैलीने व्हाईट-बॉल क्रिकेटमधील पॉवरप्ले फलंदाजीची पद्धतच बदलली.

गुजरात टायटन्सचा कोचिंग स्टाफ

हेडन आता मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरासोबत कोचिंग स्टाफमध्ये सामील होणार आहेत. ते विशेषतः संघाच्या फलंदाजांसोबत काम करतील. या संघात शुभमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलह आणि ग्लेन फिलिप्ससारखे स्टार फलंदाज आहेत. हेडनची आक्रमक फलंदाजी तंत्र आणि गिलचे नेतृत्व यांच्या जोरावर गुजरात संघ यंदाच्या हंगामात कशी कमागिर करतो ते पाहण्याजोगे असेलय 

English
हिंदी सारांश
Web Title : Hayden joins Gujarat Titans: To coach Gill's team for IPL 2026.

Web Summary : Matthew Hayden is Gujarat Titans' batting coach for IPL 2026. The former CSK opener will mentor Shubman Gill's team. Hayden's experience aims to boost the team's batting performance. He joins head coach Ashish Nehra, focusing on players like Gill and Sudarshan.
टॅग्स :आयपीएल २०२६गुजरात टायटन्सशुभमन गिलआशिष नेहरा