Join us  

#Global T20 : युवराजच्या संघाने नोंदवला निषेध; मानधन न मिळाल्यानं दिला खेळण्यास नकार 

भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये बुधवारी मानापमानाचे नाट्य रंगले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 1:47 PM

Open in App

कॅनडा : भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये बुधवारी मानापमानाचे नाट्य रंगले. त्यामुळे युवराजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टोरांटो नॅशनल्स आणि माँट्रीअल टायगर्स यांच्यातील सामना दोन तास उशीराने सुरू झाला. मानधन न मिळाल्यामुळे खेळाडूंनी सामना न खेळण्याचा पवित्रा घेतला होता, पण त्यांची मनधरणी केल्यानंतर अखेरीस दोन तास उशीराने या सामन्याला सुरूवात झाली. मानधन न मिळाल्यानं खेळाडूंनी खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त पसरताच ग्लोबल ट्वेंटी-20 लीगनं त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर तांत्रिक कारणास्तव सामना उशीरा सुरू होणार असल्याची प्रतिक्रिया देत चर्चा खोडून काढली.

दोन तासानंतर सुरू झालेल्या सामन्यात टोरांटो संघाने बाजी मारली.

धक्कादायक! पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंगची ऑफरक्रिकेट जगताला लागलेली क्रिकेटची कीड काही नष्ट होण्याचे नाव घेताना दिसत नाही. कारण सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूला मॅच फिक्संगची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलशी दोन व्यक्तींनी संपर्क साधला आणि त्याच्याकडून त्यांनी काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याला सामन्यामध्ये खेळताना काही गोष्टी करू शकतो का, असेही विचारले. उमरने या व्यक्तींशी संपर्क तोडला असून याबाबतची माहिती पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला दिली आहे.

सध्याच्या घडीला कॅनडामध्ये ग्लोबल ट्वेन्टी-२० लीग सुरु आहे. या लीगमध्ये भारताचा युवराज सिंगही खेळत आहे. या लीगमधील सामन्यात मॅच फिक्संग करण्यासाठी उमरला सांगण्यात आले होते. या दोन व्यक्तींमध्ये एकाचे नाव मंसूर खान आणि दुसऱ्याचे कृष असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांपासून सर्वच संघांनी लांब रहावे, असा इशारा भ्रष्टाचारविरोधी पथकाने दिला आहे.

टॅग्स :युवराज सिंगटी-20 क्रिकेट