पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई

कंपनीच्या संचालकांनी अधिकाऱ्याची तक्रार केल्यानंतर  सीबीआयने सापळा रचून अगरवालला लाचेचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना अटक केली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 06:21 IST2025-12-24T06:21:28+5:302025-12-24T06:21:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
GST Superintendent arrested while taking bribe of five lakhs; Officer found guilty, CBI takes action | पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई

पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : एका खासगी कंपनीच्या लेखा परीक्षणादरम्यान कंपनीला ९८ लाखांचा कर लावण्याची धमकी देत ते प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या (सीजीएसटी) अधीक्षकाला सीबीआयने मुंबईत अटक केली. अंकित अगरवाल असे त्याचे नाव आहे.  

संबंधित कंपनीच्या संचालकांनी अधिकाऱ्याची तक्रार केल्यानंतर  सीबीआयने सापळा रचून अगरवालला लाचेचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना अटक केली. 

घरात १८ लाखांची रोकड 
अटक केल्यानंतर सीबीआयने या अधीक्षकाच्या निवासस्थानी छापेमारी केली. असता त्याच्याकडे १८ लाख ३० हजारांची रोकड, ४० लाख रुपयांच्या आणि ३२ लाख रुपयांच्या मालमत्तांची कागदपत्रेही आढळली. 
सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीचे लेखा परीक्षण करताना अगरवालने कंपनीच्या संचालकाला आपण कंपनीला ९८ लाख रुपयांच्या कराची नोटीस जारी करत असल्याचे सांगितले. 
तसेच, हे प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, तडजोडीअंती लाचेची रक्कम १७ लाख रुपये निश्चित करण्यात आली. 

Web Title : जीएसटी अधीक्षक रिश्वत लेते गिरफ्तार; सीबीआई ने संपत्ति का खुलासा किया

Web Summary : मुंबई में सीबीआई ने सीजीएसटी अधीक्षक को टैक्स ऑडिट मामले को निपटाने के लिए ₹20 लाख की रिश्वत मांगने पर गिरफ्तार किया। उसे ₹5 लाख लेते हुए पकड़ा गया। उनके आवास पर छापे में ₹18.3 लाख नकद और लाखों की संपत्ति के दस्तावेज मिले।

Web Title : GST Superintendent Arrested Taking Bribe; CBI Uncovers Wealth

Web Summary : A CGST superintendent in Mumbai was arrested by the CBI for demanding a ₹20 lakh bribe to settle a tax audit matter. He was caught accepting ₹5 lakh. Raids at his residence revealed ₹18.3 lakh in cash and property documents worth lakhs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.