Join us

पणजोबा, आजोबा, बाबा आणि आता तोदेखील खेळतोय क्रिकेट

एका कुटुंबाची चक्क चौथी पिढी आता क्रिकेट खेळत असल्याचे समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 12:24 IST

Open in App

मुंबई : घराणेशाही, हा शब्द आपल्यासाठी परवलीचा. पण तो बहुतांशी भारतीय राजकारणात वापरला जातो. पण क्रिकेटमध्ये अशी घराणेशाही पाहायला मिळत नाही. कारण क्रिकेटमध्ये कामगिरी दाखवा आणि संघाता जागा मिळवा, अशी गोष्ट असते. पण एका कुटुंबाची चक्क चौथी पिढी आता क्रिकेट खेळत असल्याचे समोर आले आहे.

भारतामध्येही पिता-पूत्र क्रिकेटपटू झाल्याचे आपण पाहिले आहे. अमरनाथ, गावस्कर, मांजरेकर आणि आता तेंडुलकर, अशी बरीच घराणी आपण सांगू शकतो. पण भारतामध्ये एखाद्या घराण्याची चौथी पिढी क्रिकेट खेळत असल्याचे मात्र दिसलेले नाही.

ही गोष्ट आहे न्यूझीलंडमधली.न्यूझीलंडच्या प्लंकेट शिल्ड स्पर्धेतील वेलिंग्टनच्या संघात माकल स्नेडेनचा समावेश करण्यात आला आहे. 27 वर्षीय स्नेडेनचा आज पहिला सामना कँटेरबरी संघाबरोबर होता. क्रिकेट खेळणारा मायकल हा स्नेडेन कुटुंबियाच्या चौथ्या पिढीतील सदस्य आहे.

मायकलचे पणजोबा नेसी स्नेडेन (1909-10 ते 1927-28 पर्यंत) न्यूझीलंडच्या ऑकलंडकडून क्रिकेट संघाकडून खेळले होते. मायकलचे आजोबा वॉरविक स्नेडन (1946-47 मध्ये) आणि वडिल मार्टिन स्नेडन (1977-78 ते 1989-90 पर्यंत) ऑकलंडकडून क्रिकेट संघाकडून खेळले होते. आता मायकल हा स्नेडन कुटुंबियांचा चौथ्या पिढीतील सदस्य खेळत आहे.

टॅग्स :न्यूझीलंड