Join us

Good News : हार्दिक पांड्या बनणार 'बाबा'; प्रेयसी नताशा आहे प्रेग्नंट!

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 19:03 IST

Open in App

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनणार आहे. त्यानं इंस्टाग्रामवरून ही गोड बातमी दिली. हार्दिकनं 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुबईत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसह साखरपुडा केला होता. त्यानंतर हे कपल सोबतच आहेत. लॉकडाऊनमुळे नताशा ही पांड्या कुटुंबीयांसोबतच राहत आहे. रविवारी हार्दिकनं नताशासोबतचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली. मुंबई इंडियन्सनं त्यांचं अभिनंदन केलं.

हार्दिकनं 2020च्या पहिल्याच दिवशी नताशासोबत दुबईत साखरपुडा केला. सप्टेंबर 2019 पासून हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यानंतर दुखापतीतून सावरल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतून तो कमबॅक करणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे ती मालिका रद्द झाली. मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे नताशा हार्दिकच्या घरीच आहे.

हार्दिक-नताशा गेली अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. त्यांना अनेकवेळा एकत्रही पाहिले गेले. दोन महिन्यांपूर्वी हार्दिकनं मुंबईत झालेल्या एका पार्टीमध्ये भाऊ कृणालची नताशाशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर त्यांच्या प्रेमाचं अंकुर अजून फुललं... नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिकनं नताशासोबत साखरपुडा करून प्रेमाची कबुली दिली. हार्दिकनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत दोघंही एकमेकांना किस करताना दिसले होते.  

 सर्बियन नागरिक असलेल्या नताशाने 'सत्याग्रह'सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. नुकत्याच झालेल्या नच बलिये या कार्यक्रमात ती एक्स बॉयफ्रेंड एल. गोनीसोबत सहभाग घेतला होता.   

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिच