Join us  

Rohit Sharma Fitness Test: रोहित शर्मा अन् टीम इंडियाच्या फॅन्ससाठी खुशखबर! 'हिटमॅन'ने पास केली फिटनेस टेस्ट, संघ निवडीच्या बैठकीसाठीही हजर राहणार

दुखापीतमुळे रोहितला आफ्रिकेच्या संपूर्ण दौऱ्याला मुकावं लागलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 4:38 PM

Open in App

Rohit Sharma Fitness Test: गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटरसिकांना फारसं आनंदी व्हायची संधी मिळाली नाही. पण आज टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली असून भारताचा कर्णधार रोहित शर्मा फिटनेस चाचणीत पास झाला. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितकडे टी२० आणि वन डे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. पण दुखापतीमुळे तो आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. त्यानंतर आज रोहित शर्माने फिटनेस चाचणी पास केल्याने आता तो आगामी विंडिजविरूद्धच्या मालिकेत खेळणार असल्याचे नक्की झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळीच निवड समिती वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करणार असून या बैठकीत रोहित शर्मा कर्णधार म्हणून हजर असेल.

रोहित बंगळुरूच्या NCA मध्ये दुखापतीतून सावरला

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माच्या स्नायूंमध्ये तणाव जाणवला. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला होता. कसोटी आणि वन डे अशा दोन्ही मालिकांमधून त्याने माघार घेतली होती. तो गेल्या काही दिवसांपासून तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत होता आणि तिथेच तो बरा होत होता. बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार, दुखापतीतून किंवा कोणत्याही समस्येतून पुनरागमन करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला फिटनेस चाचणी पास होणे आवश्यक आहे. त्यानुसार फिटनेस चाचणी देऊन आता रोहित पुनरागमनासाठी सज्ज आहे.

विंडिजचा भारत दौरा

वन डे मालिका

पहिली वन डे - ६ फेब्रुवारी - अहमदाबाददुसरी वन डे - ९ फेब्रुवारी - अहमदाबादतिसरी वन डे - ११ फेब्रुवारी - अहमदाबाद

टी२० मालिका

पहिली टी२० - १६ फेब्रुवारी - कोलकातादुसरी टी२० - १८ फेब्रुवारी - कोलकातातिसरी टी२० - २० फेब्रुवारी - कोलकाता

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघविराट कोहली
Open in App