Join us

गोड बातमी : अजिंक्य रहाणेच्या घरी आली नन्ही परी!

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या घरी नन्ही परी आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 09:49 IST

Open in App

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या घरी नन्ही परी आली आहे. रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे आहे. त्याला ही आनंदवार्ता भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्विटरद्वारे दिली. भज्जीनं ट्विट करून अजिंक्य रहाणे बापमाणूस झाल्याची गोड बातमी सर्वांना दिली. 

अजिंक्य आणि राधिका धोपावकर हे शाळेतील मित्र...ही दोघ सोबतच लहानाची मोठी झाली आणि या प्रवासात त्यांची मनंही जुळत गेली. याबाबत त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं नव्हतं. पण, या दोघांमधील प्रेम घरच्यांना कळलं होतं आणि त्यांनीच दोघांना एकमेकांशी लग्न कराल का, असे विचारले. या दोघांनीही त्वरीत होकार कळवला. 26सप्टेंबर 2014मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला.  

टॅग्स :अजिंक्य रहाणेहरभजन सिंग