Join us  

Good Bye 2019 : फक्त ही ३० मिनिटं सोडल्यास भारतीय संघ राहीला जबरदस्त

भारतीय संघाने २०१९ या वर्षात ५२ सामने खेळले. या ५२  सामन्यांमध्ये ३५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 2:10 PM

Open in App
ठळक मुद्देया वर्षात भारताने सात कसोटी, १६ एकदिवसीय आणि ९ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये विजय मिळवला.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघासाठी २०१९ हे भारतीय संघ जबरदस्तच राहीले होते. पण या वर्षातील फक्त ३० मिनिटांनी मात्र भारतीय संघाचा घात केला. गेल्या वर्षातील या ३० मिनिटांमुळे भारतीय संघाला जोरदार टीकाही सहन करावी लागली होती.

भारतीय संघाने २०१९ या वर्षात ५२ सामने खेळले. या ५२  सामन्यांमध्ये ३५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. या वर्षात भारताने सात कसोटी, १६ एकदिवसीय आणि ९ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्याचबरोबर या वर्षभरात १४ मालिका भारतीय संघाने खेळल्या. या १४ मालिकांपैकी भारताने १० मालिका जिंकल्या, तर दोन मालिकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि एक मालिका अनिर्णित राहिली. या गोष्टी पाहून भारताला हे वर्ष कसे गेले,हे तुम्ही समजू शकता. पण फक्त त्या ३० मिनिटांमुळे भारतीय संघाने साऱ्यांना निराश केले.

ही ३० मिनिटे नेमकी कोणती, याचा विचार आता तुम्ही करत असाल. या वर्षी इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी राहीली. या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडने पराभूत केले आणि त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील पहिल्या ३० मिनिटांमध्येच भारताने पराभव पत्करल्याचे पाहायला मिळाले. कारण या पहिल्या ३० मिनिटांमध्ये भारताने फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला गमावले होते. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलहेदेखील बाद झाले. भारतीय संघ या धक्क्यातून सावरू शकला नाही आणि त्यांचा पराभव झाला.

भारताने पहिल्या ३० मिनिटांमध्ये आपले तीन फलंदाज गमावले. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी भारताची खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताच्या संघावर आणि संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका झाली. पण फक्त ही गोष्ट वगळता भारताने यंदाच्या वर्षात चांगली कामगिरी केली, हे निश्चितच आपण म्हणू शकतो.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजालोकेश राहुल