सुनील गावसकर लिहितात...
भारतीय संघ पराभवामुळे निराश झालेल्या दक्षिण आफ्रिका संघावर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. टी-२० मालिकेच्या पहिल्या लढतीत पाहुण्या संघाने चमकदार कामगिरी केल्यामुळे यजमान संघाच्या तंबूत मालिकेतील उर्वरित लढतींबाबत चिंतेचा वातावरण आहे.
अनुभव नसलेल्या वेगवान गोलंदाजांमुळे दक्षिण आफ्रिका संघाला रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीला रोखण्यात यश आले नाही. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आक्रमक फटकेबाजी करीत उर्वरित कसर भरून काढली. भारतीय संघाच्या आक्रमक कामगिरीमुळे चांगले क्षेत्ररक्षण करणारा संघ असा दर्जा असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी झेल सोडण्याव्यतिरिक्त अतिरिक्त धावाही बहाल केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना प्रति षटक १० धावांची सरासरी राखणे कठीण असते आणि अशा परिस्थितीत भुवनेश्वर व बुमराह यांच्या अचूक गोलंदाजीमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली.
दरम्यान, हेंड्रिक्स व बेहार्डियनने चांगली भागीदारी करीत आशा पल्लवित केल्या होत्या, पण संघाला लक्ष्य गाठून देण्यात त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. भारतीय संघाने या लढतीत सहज विजय मिळवला.
सेंच्युरियनची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात एकदिवसीय लढतीदरम्यान याची प्रचिती आली. त्यामुळे मधल्या षटकांमध्ये चहल निर्णायक भूमिका बजावू शकतो. गेल्या लढतीदरम्यान विराट कोहलीला मैदान सोडावे लागले होते. दुसºया लढतीत यजमान संघाला पराभूत करण्यासाठी भारतीय
कर्णधार मैदानावर परतेल, अशी आशा आहे. तिसºया टी-२० सामन्यात भारतीय महिलांनी चांगल्या सुरुवातीनंतर द. आफ्रिकाला विजयाची संधी दिली. खेळातील उणिवा दूर करीत आगेकूच करणे महत्त्वाचे ठरते. स्मृती मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी सहज चौकार लगावले, पण अन्य खेळाडूंना मात्र यश आले नाही. हवेत फटके खेळून त्यांनी विकेट बहाल केल्या. त्यामुळे हरमनप्रीत व मानधना यांची मेहनत वाया गेली. भारतीय संघाला या लढतीत पूर्ण २० षटके फलंदाजीही करता आली नाही. या निराशाजनक कामगिरीनंतर प्रशिक्षकांनी खेळाडंूची नक्कीच कानउघाडणी केली असेल. जर भारताच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांनी आपापल्या लढतीत विजय मिळवत मालिका जिंकण्याचा पराक्रम केला तर यजमान संघासाठी हा मोठा धडा राहील. (पीएमजी)