Join us

हर्षलला १४-१५ कोटींचा बोनस द्या, सेहवानची मजेदार मागणी

हर्षलने काल लखनौविरुद्ध एलिमिनेटरमध्ये चांगली गोलंदाजी करीत चार षटकात २५ धावांत एक गडी बाद केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 05:35 IST

Open in App

नवी दिल्ली : आरसीबीचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षल पटेलची वीरेंद्र सेहवागने प्रशंसा केली आहे. हर्षलच्या कामगिरीसाठी आरसीबीने त्याला आता १४-१५ कोटींचा बोनस द्यायला हवा, असे मजेदार आवाहन सेहवागने केले.

हर्षलने काल लखनौविरुद्ध एलिमिनेटरमध्ये चांगली गोलंदाजी करीत चार षटकात २५ धावांत एक गडी बाद केला. हर्षलच्या या प्रभावी कामगिरीचा उल्लेख करीत सेहवागने डेथ ओव्हरमधील उपयुक्त हर्षल पटेल याला त्याच्या कामगिरीची योग्य किंमत मिळायला हवी, असे म्हटले आहे. क्रिकबजशी बोलताना सेहवाग पुढे म्हणाला, ‘राहुल तेवतिया स्वत:च्या १० कोटी किमतीला कसा न्याय देतो याची आम्ही नेहमी चर्चा करतो. गुजरात टायटन्सला त्याने विजयदेखील मिळवून दिले आहेत. हर्षलची किंमत फारच कमी आहे. ’

टॅग्स :आयपीएल २०२२विरेंद्र सेहवाग
Open in App