मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात शुक्रवारी एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेकीदरम्यान गुजरातचा कर्णधार शुभमन गिलन आणि मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या यांनी हास्तांदोलन केले नाही. मात्र, त्यानंतर हार्दिक आणि गिल यांच्यात मदभेद असल्याच्या अफवांना जोर आला. यावर शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया दिली.
नुकतीच शुभमन गिलने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यात त्याने हार्दिक पांड्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, प्रेमाशिवाय काहीही नाही. इंटरनेटवर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. याशिवाय, त्याने हार्दिक पांड्यालाही टॅग केले.
गुजरात आणि मुंबई यांच्यातील सामन्यात नाणेफेकीदरम्यान शुभमन गिल हार्दिकशी हास्तांदोलन न करता येथून निघून गेला. त्यानंतर शुभमन गिल आऊट झाल्यानंतर हार्दिक पांड्यानेही अनोख्या अंदाजात सेलिब्रेशन करताना दिसला. एलिमिनेटर सामन्यात गिल फक्त एक धाव करून बाद झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शुभमन गिलला ट्रोल केले.
मुंबईचा गुजरातवर विजय
एलिमिनेटर सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावांचा मोठी धावसंख्या उभारली. रोहित शर्माने ८१ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त जॉनी बेअरस्टो, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनीही लहान पण महत्त्वाच्या खेळी केल्या आणि मुंबईच्या विजयात मोठे योगदान दिले. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघाला निर्धारित २० षटकांत फक्त २०८ धावाच करता आल्या.