दुबई : विराट कोहली रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ करणार आहे. कामगिरीत सातत्य राखणाऱ्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध त्यांची गाठ पडणार आहे.
उभय संघांत आक्रमक फलंदाजांचा समावेश असून काहीजण एकट्याच्या बळावर सामन्याचा निकाल पलटवण्यास सक्षम आहेत. कोहलीची गेल्या काही मोसमातील कामगिरी शानदार ठरली आहे. स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या संघात आॅस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार अॅरोन फिंच जुळल्यामुळे फलंदाजीची बाजू अधिक मजबूत झाली आहे. युवा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कल याच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे.
दुसºया बाजूचा विचार करता वॉर्नरने या स्पर्धेत तीनवेळा आॅरेंज कॅपचा (मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज) मान मिळवला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०१६ मध्ये जेतेपद पटकावले होते. वॉर्नर व जॉनी बेयरस्टॉ स्पर्धेत सर्वाधिक धोकादायक सलामीच्या जोडीपैकी एक आहे.
गेल्या मोसमात आरसीबीविरुद्ध या जोडीने सलामीला विक्रमी (आयपीएल) भागीदारी केली होती. त्या कामगिरीची पुनरागवृत्ती करण्यास ते उत्सुक आहेत. सनरायजर्स संघात केन विलियम्सन, मनीष पांडे, मिशेल मार्श आणि फेबियन एलेन यांच्यासारखे दिग्गज फलंदाज आहेत.
गेल्या मोसमात अखेरच्या स्थानावर राहिलेला आरसीबी संघ यंदाच्या मोसमात संतुलित भासत आहे, पण त्याची खात्री मैदानावर होईल.
सनरायजर्सची तळाच्या फळीतील फलंदाजी कमकुवत बाजू सिद्ध होऊ शकते.
फॅ्रँचायझीने विराट सिंग, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग आणि अब्दुल समद यांच्यासारख्या युवा फलंदाजांवर विश्वास दाखविला आहे.
आरसीबीने गेल्या मोसमात अखेरच्या षटकांमध्ये बºयाच धावा बहाल केल्या होत्या आणि संघ ही उणीव दूर करण्यास प्रयत्नशील आहे. फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसचा संघात समावेश केला आहे.
वेदर रिपोर्ट । तापमान ३७ डिग्री सेल्सियसच्या आसपास राहील. उकाडा असेल. वेगवान वाºयाची दाट शक्यता.
पीच रिपोर्ट । खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहण्याची शक्यता. फलंदाज स्थिरावले तर धावा वसूल करू शकतात.
मजबूत बाजू
आरसीबी । अॅरोन फिंचच्या समावेशामुळे फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे.
हैदराबाद । वॉर्नर व जॉनी बेयरस्टॉ सर्वांत धोकादायक सलामीच्या जोडीपैकी एक. फिरकीपटू राशिद खानची उपस्थिती.
कमजोर बाजू
आरसीबी । प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला लगाम घालणे कठीण. उमेश यादव व डेल स्टेन यांच्यावर विसंबून.
हैदराबाद । तळाची फळी कमकुवत. अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, अब्दुल समद यांच्यासारख्या युवा खेळाडूंवरील विश्वास अंगलट येण्याची शक्यता.