Join us  

लाळेची सवय सुटणे सोपे नाही, मात्र... - कुलदीप

लखनौ : चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर ही बालपणापासूनची सवय आहे. ती एकदम सुटणे सोपे नाही. तथापि नव्या परिस्थितीशी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 2:33 AM

Open in App

लखनौ : चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर ही बालपणापासूनची सवय आहे. ती एकदम सुटणे सोपे नाही. तथापि नव्या परिस्थितीशी सामंजस्य राखण्याच्या दृष्टीने सवय मोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव याने म्हटले आहे.

अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट समितीने कोरोनामुळे चेंडूवर लाळेचा वापर करण्यास बंदीचा प्रस्ताव दिला होता. बदलत्या धोरणानुसार गोलंदाजांना चेंडूवर नियंत्रण मिळविणे फार कठीण जाणार असल्याचे मत कुलदीपने व्यक्त केले. कुलदीप पुढे म्हणाला, ‘चेंडूला चकाकी आणण्यासाठी सर्वच क्रिकेटपटू लहानपणापासून लाळेचा वापर करतात. मात्र आता बंदी आली. मी लाळेविना गोलंदाजीचा प्रयत्न करीत आहे. क्रिकेट पूर्वीसारखे भरात येईल तोवर कोरोनाचा प्रकोप पूर्णपणे संपलेला असेल, अशी मला आशा आहे. लाळेचे अनेक पर्याय पुढे येतील. वर्षानुवर्षे असलेली ही सवय सोडण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेटपटूंना सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करावेच लागेल.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :कुलदीप यादवभारतीय क्रिकेट संघ