नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बिहार क्रिकेट असोसिएशनला रणजी करंडकासह अन्य राष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यास परवानगी बहाल केली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने गुरुवारी एका आदेशाद्वारे बिहारला क्रिकेट खेळण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे म्हटले आहे.
याआधी बीसीसीआयने बिहार क्रिकेट संघटनेला राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत सहभागापासून रोखले होते. न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. पाटील यांच्या सहभाग असलेल्या पीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पदावर आलेल्या बिहार क्रिकेट संघटनेकडे राज्य क्रिकेटचा कारभार सोपविण्यात यावा आणि क्रिकेटचे हित पाहता हा आदेश पारित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)