बाबांची ऑटोग्राफ घ्यायला 'तो' मैदानात घुसला आणि व्हिडीओ क्रीडा विश्वात पसरला

ही गोष्ट घडली ती ऑस्ट्रेलियामध्ये. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 15:50 IST2019-01-14T15:49:36+5:302019-01-14T15:50:34+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
To get the autograph of father, he got into the field and video get viral | बाबांची ऑटोग्राफ घ्यायला 'तो' मैदानात घुसला आणि व्हिडीओ क्रीडा विश्वात पसरला

बाबांची ऑटोग्राफ घ्यायला 'तो' मैदानात घुसला आणि व्हिडीओ क्रीडा विश्वात पसरला

नवी दिल्ली : आपल्या आवडता खेळाडू चांगला खेळ करत असेल तर त्याला मैदानात भेटण्याचा बऱ्याच चाहत्यांना मोह होतो. काही चाहते कसलीही पर्वा न करता थेट मैदानात घुसतात आणि आपल्या आवडत्या खेळाडूला भेटतात. पण आज एक अशी गोष्ट घडली की, आपल्या बाबांची ऑटोग्राफ घ्यायला 'तो' चक्क मैदानात घुसल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट घडली ती ऑस्ट्रेलियामध्ये. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारताने कसोटी मालिका जिंकली असली तरी ते सध्या एकदिवसीय मालिकेत पिछाडीवर आहेत. कारण पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला 34 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता दुसरा सामना भारताला जिंकता आला नाही तर त्यांना मालिका गमवावी लागणार आहे.

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग सुरु आहे. या लीगमधील अॅडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर्स यांच्यातील सामन्यामध्ये ही गोष्ट पाहायला मिळाली. सिडनी थंडर्स संघाचा कर्णधार शेन वॉटसनला सामना सुरु असताना त्याचा मुलगा मैदानात शिरला. तो थेट आपल्या बाबांकडे गेला आणि ऑटोग्राफ मागितली. वॉटसननेही त्याला ऑटोग्राफ दिली. त्याच्याबरोबर फोटो काढला. हा सारा प्रकार एका व्हिडीओमध्ये कैद करण्यात आला. बिग बॅशने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला असून तो चांगलाच वायरल झाला आहे.




 



 



 

Web Title: To get the autograph of father, he got into the field and video get viral