Join us

गेलकडे विंडीजचे उपकर्णधारपद

इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजने आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 05:08 IST

Open in App

जमैका : इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजने आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविली आहे. पाचव्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत असलेला गेल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये त्याने सुमारे ५०० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन शतके व दोन अर्धशतके झळकावली होती.गेल म्हणाला, ‘कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये देशाकडून प्रतिनिधित्व करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. हा विश्वचषक माझ्यासाठी विशेष असणार आहे. गेलने जून २०१० मध्ये वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व केले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :ख्रिस गेलवेस्ट इंडिजवर्ल्ड कप २०१९