नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने म्हटले की, भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल खूप त्रास देतो आणि यामुळे गेल त्याला ब्लॉक करणार आहे. सोशल मीडियावर सर्वात व्यस्त असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक चहल आहे. कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान तो सोशल मीडियावर अधिक वेळ व्यतीत करत आहे. आपल्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गेलने इन्स्टाग्रामवर आयोजित केलेल्या एका सत्रामध्ये चहलला म्हटले की, ‘मी गंभीरतेने टिकटॉकला तुला ब्लॉक करण्यास सांगेन. तू सोशल मीडियावर मला खूप राग आणतोस. तुला सोशल मीडियापासून दूर राहावे लागेल. आम्ही चहलपासून त्रासलो आहोत. मला माझ्या आयुष्यात तुला पुन्हा पाहायचे नाही. मी तुला ब्लॉक करणार आहे.’