Join us

एकही चेंडू न खेळता गेलला मिळाले दोन कोटी, कसे ते जाणून घ्या...

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल हा धमाकेदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक लीगमध्ये त्याला संघात घेण्यासाठी प्रत्येक मालक उत्सुक असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 15:25 IST

Open in App
ठळक मुद्देगेल एकदा मसाज करायला गेला होता.एका स्त्रीकडून मसाज करून घेताना गेलने जे काही केले, ते सांगण्यासारखे नाही, असे काहींनी म्हटले होते.

सिडनी : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल हा धमाकेदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक लीगमध्ये त्याला संघात घेण्यासाठी प्रत्येक मालक उत्सुक असतात. त्याच्यासाठी कितीही पेसे खर्च करायला ते तयार असतात. पण आता तर एकही चेंडू न खेळता तब्बल दोन कोटी रुपये गेलने कमावले आहेत.

गेलबाबतची एक बातमी ऑस्ट्रेलियातील सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एज या दोन वृत्तपत्रांनी एक बातमी दिली होती. या बातमीमध्ये लिहीले होते की, ' गेल एकदा मसाज करायला गेला होता. एका स्त्री कडून मसाज करून घेताना गेल पूर्णपणे नग्न झाला होता.' 

या लेखाचे पडसाद चांगलेच उमटले आणि त्यानंतर गेलने या दोन्ही वृत्तपत्रांच्या फायरफॅक्स मीडियाला याबाबत कळवले. पण या मीडिया हाऊसने गेलचे काही ऐकले नाही. त्यानंतर गेलने याबाबत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. गेलने या मीडीया हाऊसविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. गेलची याचिका न्यू साऊथ वेल्स येथील सर्वोच्च न्यायालयात सुरु होती. या खटल्याचा निकाल आला असून फायरफॅक्स मीडियाला दोन कोटी दहा लाख रुपयांचा दंड भरवाला लागणार आहे आणि ही रक्कम गेलला देण्यात येणार आहे.

टॅग्स :ख्रिस गेल