Join us

विविध भूमिकांमुळे राहुलने निर्माण केली ओळख, गावसकर यांनी सांगितला राहुलच्या यशाचा मंत्र

एका कर्णधाराव्यतिरिक्त त्याने यष्टिरक्षक व आक्रमक सलामीवीर म्हणून लोकेश राहुलने आपली ओळख निर्माण केली आहे. या विविध भूमिकांमध्ये यशस्वी ठरल्यामुळे राहुल गावसकर यांच्या प्रशंसेस पात्र ठरला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:07 IST

Open in App

दुबई : भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सामन्यांमध्ये किंग्स इलेव्हनचा कर्णधार के. एल. राहुलच्या कामगिरीची प्रशंसा केली. या युवा क्रिकेटपटूसाठी यंदाचे आयपीएल सत्र विशेष यशस्वी ठरले आहे. तो यंदाच्या मोसमात पंजाबचे नेतृत्व करताना विविध भूमिका बजावत आहे. एका कर्णधाराव्यतिरिक्त त्याने यष्टिरक्षक व आक्रमक सलामीवीर म्हणून लोकेश राहुलने आपली ओळख निर्माण केली आहे. या विविध भूमिकांमध्ये यशस्वी ठरल्यामुळे राहुल गावसकर यांच्या प्रशंसेस पात्र ठरला आहे. 

मंगळवारी रात्री किंग्स इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स लढतीदरम्यान गावसकर यांनी राहुलची शानदार फलंदाजी व सातत्य याचे रहस्य सांगितले. गावसकर म्हणाले,‘ही बँगलोरच्या पाण्याची विशेषता आहे. बँगलोरने देशाला अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू दिलेले आहेत. केवळ क्रिकेटच नव्हे तर सर्वंच खेळामध्ये बँगलोरच्या खेळाडूंनी छाप सोडली आहे. त्यात माझ्या सर्वांत आवडीचे प्रकाश दुकोणव्यतिरिक्त गुंडप्पा विश्वनाथ, इरापल्ली प्रसन्ना, अनिल कुंबळे, राहुल द्रविड अशी अनेक नावे आहेत. त्यांनी जागतिक पातळीवर देशाचा मान उंचावली आहे. हे सर्वकाही बँगलोरच्या पाण्याची देण आहे.’

लोकेश राहुलधावा - ५४०सामने - १० 

टॅग्स :सुनील गावसकरIPL 2020आयपीएल