Join us  

ICC World Cup 2019 : हा काय फालतू नियम? गौतम गंभीर, युवराज सिंग यांची तीव्र शब्दात नाराजी

वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने चौकारांच्या फरकानं बाजी मारताना जेतेपदाचा मान पटकावला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:13 PM

Open in App

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने चौकारांच्या फरकानं बाजी मारताना जेतेपदाचा मान पटकावला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला हा सामना निर्धारीत 50 षटकांत 241-241 असा आणि सुपर ओव्हरमध्ये 15-15 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे सर्वाधिक चौकार मारणाऱ्या इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. न्यूझीलंडने या सामन्यात 14, तर इंग्लंडने 22 चौकार मारले. त्यामुळे इंग्लंडला जेतेपदाचा मान मिळाला. आयसीसीच्या या नियमावर भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. 

जोफ्रा आर्चर ठरला 'ज्योतिषाचार्य'; चार वर्षांपूर्वीचं भाकित तंतोतंत खरं ठरलं!

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून 8 बाद 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 241 धावांवरच तंबूत परतला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यातही इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडला 15 धावा करता आल्या. सर्वाधिक चौकार मारल्यामुळे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात बेन स्टोक्सने जीगरबाज खेळी केली. त्यानं 98 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार लगावून 84 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. 

रोहित, स्टार्क अव्वल तरीही 'यानं' पटकावला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान! 

माजी खेळाडू गौतम गंभीरनं आयसीसीच्या नियमावर टीका केली. तो म्हणाला,''वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा निकाल असा कसा ठरवला जाऊ शकतो, हेच कळत नाही. हा हास्यास्पद नियम आहे. हा सामना बरोबरीत सुटला आहे. दोन्ही संघांचे मी अभिनंदन करू इच्छितो. दोघेही विजेते आहेत.'' युवराजनं लिहीलं की,'' या नियमाशी मी सहमत नाही. पण, नियम हे नियम असतात. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडचे मी अभिनंदन करतो. न्यूझीलंडने अखेरपर्यंत कडवी झुंज दिली.'' 

इंग्लंडच्या विजयात 'परप्रांतियांचा' मोठा वाटा, जाणून घ्या कसा!

न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या खेळाडूनं केला किवींचा पराभव; कोण आहे घर का भेदी?

ICC World Cup 2019 : क्रिकेट, ये खेल है महान!

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019गौतम गंभीरयुवराज सिंगइंग्लंडन्यूझीलंड