ठळक मुद्देगंभीर कोलकाता संघाचा कर्णधार होता, युवराज सिंगला खरेदी करण्यात कुठल्याही फ्रेंचायजीने रस दाखवला नाहीकिंग्ज इलेव्हन पंजाबने 2.60 कोटीची बोली लावल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सने 2.80 कोटींना गंभीरला विकत घेतले.
बंगळुरु - आयपीएलच्या 11 व्या मोसमासाठी सुरु असलेल्या लिलावात लोकेश राहुल, मनीष पांडे आणि करुण नायर या युवा भारतीय क्रिकेटपटूंना चांगली किंमत मिळाली. पण गौतम गंभीर आणि युवराज सिंग या सिनिअर प्लेअर्सना चढया किंमतीला खरेदी करण्यात कोणीही फारसा रस दाखवला नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि सन रायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी गंभीर आणि युवराजला आपल्याकडे कायम ठेवसाठी राईट टू मॅच कार्डाचा वापर केला नाही.
गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार होता. युवराज सिंगला खरेदी करण्यात कुठल्याही फ्रेंचायजीने रस दाखवला नाही तेव्हा किंग्स इलेव्हन पंजाबने युवराजला त्याच्या बेस प्राईसला म्हणजे 2 कोटी रुपयांना विकत घेतले. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने आयपीएलची दोन विजेतेपद पटकावली आहेत. पण केकेआरने त्याला कायम ठेवण्यात अजिबात रस घेतला नाही.
किंग्ज इलेव्हन पंजाबने 2.60 कोटीची बोली लावल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सने 2.80 कोटींना गंभीरला विकत घेतले. युवराज संघात परतल्यानंतर प्रिती झिंटाला आपला आनंद लपवता आला नाही. गंभीरने दिल्लीच्या संघात आल्यानंतर मी घरी परतलो असे टि्वट केले.