Join us  

गौतम गंभीर, सुनील छेत्री हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

गंभीर, छेत्री पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 4:29 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्यासह तिरंदाज एल बोम्बल्या देवी आणि बास्केटबॉलपटू प्रशांती सिंग यांना शनिवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याहस्त पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानतर गौतम गंभीर म्हणाला,''भारतीय क्रिकेटने दिलेल्या पाठिंब्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. यात टीकाकारांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे.''  याआधी टेबलटेनिसपटू शरथ कमल, कुस्तीपटू बजरंग पुनिया, बुद्धिबळपटू हरिका द्रोणावली आणि कबड्डीपटू अजय ठाकूर यांनाही हा प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. गंभीरने 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिेकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या नावावर 10000 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता.   

टॅग्स :गौतम गंभीरसुनील छेत्री