Join us  

२६ मे साठी कामाला लागा...! गौतम गंभीरनं KKR च्या खेळाडूंना पहिल्याच भेटीत दिलेलं भारी स्पीच

भारताचा माजी सलामीवीर KKR च्या मेंटॉरपदी विराजमान झाल्यापासून संघाच्या कामगिरीचा आलेच चढाच राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 3:22 PM

Open in App

IPL 2024, KKR in Final : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या फायनलमध्ये ऐटीत प्रवेश केला. क्वालिफायर १ सामन्यात KKR ने सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवून २०२१नंतर प्रथमच आयपीएल फायनल गाठली. २०१२ व २०१४ नंतर KKR ला जेतेपद पटकावण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. विशेषतः गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने ही दोन्ही जेतेपदं जिंकली होती आणि आता गंभीर KKR चा मेंटॉर आहे. भारताचा माजी सलामीवीर KKR च्या मेंटॉरपदी विराजमान झाल्यापासून संघाच्या कामगिरीचा आलेच चढाच राहिला आहे. गौतमने त्याच्या पहिल्याचा भेटीत KKR च्या खेळाडूंना दिलेले स्पीच आता व्हायरल झाले आहे. पहिल्याच स्पीचमध्ये त्याने खेळाडूना २६ मे साठी आतापासूनच कामाला लागा, असे सांगितले होते आणि संघाने त्याचे ऐकले...

गंभीर KKR चा मेंटॉर झाल्यानंतर त्याने सुनील नरीनला पुन्हा एकदा ओपनिंगला खेळण्याची संधी दिली. या पर्वात वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूने १४ सामन्यांत १७९.८५च्या स्ट्राईक रेटने ४८२ धावा केल्या आहेत आणि १५ विकेट्सही घेतल्या आहेत. KKR ने नरीनला ओपनिंगला खेळण्याची फार संधी दिली नाही आणि त्याचा फटका त्यांना बसला.. पण, यंदा त्याच्यावर गौतमने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि संघाला स्फोटक सुरुवात करून दिली. सामन्यादरम्यानही गौतम अनेकवेळा कर्णधार श्रेयस अय्यरला मार्गदर्शन करताना दिसला.. त्याने आखलेल्या रणनीती आतापर्यंत यशस्वी ठरल्या आणि त्यामुळेच KKR च्या यशाचे श्रेय हे गौतमला दिले जात आहे.

गौतम गंभीरने KKR च्या खेळाडूंना पहिल्याच भेटीत नेमकं असं काय सांगितलं, की ज्याने संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गौतम गंभीर म्हणतो, या संघात सर्वांना समान वागणूक मिळेल.. इथे कोणी सीनियर-ज्युनियर नाही, आंतरराष्ट्रीय-देशांतर्गत क्रिकेटपटू नाही. कारण आपलं एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे ही आयपीएल जिंकणे... त्यामुळे प्रत्येकाने एका सोप्या मार्गावर चालण्यास सुरूवात करा, तो म्हणजे २६ मे आपण तिथे असायला हवं. त्यासाठी सर्वोतोपरी देण्याची तयारी ठेवा.. त्यासाठी आतापासूनच सुरूवात करा...

कर्णधार म्हणून गौतम गंभीरने आयपीएलची दोन जेतेपदं नावावर पटकावली आहे. शिवाय त्याने कर्णधार म्हणून तीनवेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे आणि मेंटॉर म्हणूनही तो तिसऱ्यांदा प्ले ऑफ खेळला आहे. यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर असताना त्याने संघाला २०२२ व २०२३ च्या प्ले ऑफमध्ये पोहोचवले होते. कोलकाताच्या निमित्ताने मेंटॉर म्हणून त्याची ही पहिलीच आयपीएल फायनल असणार आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२४गौतम गंभीरकोलकाता नाईट रायडर्स