भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मैदानातील टी-२० मालिका जिंकली. या निकालामुळं आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ तयार आहे, असे चित्र चर्चा रंगू लागली. पण संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना मात्र तसे वाटत नाही. बीसीसीआयने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात गौतम गंभीर यांनी घरच्या मैदानात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी अजून बाकी आहे, अशी कबुली देत त्यांनी संघाकडून असलेल्या अपेक्षांवरही भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोणत्याही बहाणा करुन चालणार नाही
आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसंदर्भात भारतीय संघाचा दृष्टिकोन स्पष्ट करताना गौतम गंभीर म्हणाले की, आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आम्ही जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि परिणामकेंद्री दृष्टिकोन या तत्त्वांवर भर देत देत आहोत. बहाणे नकोत; लवचिक राहून प्रत्येक सामन्यातून काहीतरी शिकण्याची गरज आहे. असेही गंभीर म्हणाले आहेत.
India Vs Australia: 'व्हाईट बॉल' क्रिकेटमध्ये काय कमावलं, काय गमावलं?
अजून अपेक्षित तयारी झालेली नाही, पण..
२०२६ च्या हंगामातील टी २० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी अजून झालेली नाही. पणपण योग्य वेळी लय गाठू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, "टी २० वर्ल्ड कपच्या दृष्टीने आपण जिथे असायला हवे तिथे अजून पोहोचलेलो नाही. फिटनेसचं महत्त्व सगळ्यांना समजेल अशी आशा आहे. आपण जिथे पोहोचण्याचं लक्ष्य ठेवलं आहे, त्यासाठी अजून तीन महिने हातात आहेत."
आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी १० टी-२० सामने
गत टी-२० वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाला घरच्या मैदानात रंगणाऱ्या टी-२० स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. या स्पर्धेआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने २-१ असा मालिका विजय मिळवला. या मालिकेनंतर आता टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांचे आव्हान असणार आहे. दोन तगडे संघ आणि वर्ल्ड कप आधी रंगणाऱ्या १० टी सामन्यानंतर गंभीर संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करणार का? ते पाहण्याजोगे असेल.