Join us  

निवृत्तीबाबत गौतम गंभीरने केला मोठा खुलासा

गंभीरने नेमकी निवृत्ती का घेतली, याचे उत्तर चाहत्यांना सापडत नव्हते. पण दस्तुरखुद्द गंभीरने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 3:46 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी निवृत्तीचा निर्णय घेतला. पण गंभीरने नेमकी निवृत्ती का घेतली, याचे उत्तर चाहत्यांना सापडत नव्हते. पण दस्तुरखुद्द गंभीरने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

गंभीरने 4 डिसेंबरला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी आंध्र प्रदेशविरुद्ध आपला हा अखेरचा सामना असेल, असे त्याने सांगितले होते. आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्या दिल्लीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आंध्र प्रदेशने पहिल्या डावात 390 धावा केल्या. यानंतर दिल्लीच्या संघाची फलंदाजीची वेळ आली. गंभीर जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्याला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता. गंभीरने अखेरच्या सामन्यातही आपले नाणे खणखणीत वाजवले. गंभीरने 185 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या जोरावर 112 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.

निवृत्तीबाबत गंभीर म्हणाला की, " मला वाटले तर जर मी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकलो तर भारतीय संघात मला स्थान मिळेल. पण तसे होऊ शकले नाही. प्रयत्न करूनही मला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते. आता यापुढे कितीही प्रयत्न केले तरी स्थान मिळणार नाही, हे मला कळून चुकले आणि त्यानंतरच मी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला." 

टॅग्स :गौतम गंभीर