Join us  

पाकिस्तानी मुलीच्या मदतीसाठी गौतम 'गंभीर', म्हणाला... जैसे बेटी घर आई है!

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तान यांच्यांतील नातं जगजाहीर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 1:20 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तान यांच्यांतील नातं जगजाहीर आहे. क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करणारा गंभीर राजकीय व्यासपीठावरूनही पाकला चोपून काढत आहे. त्यामुळे अनेकदा तो सोशल मीडियावर पाकिस्तानाकडून होणाऱ्या भारतविरोधी भूमिका घेणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत आला आहे. पण, माजी क्रिकेपटूचा एक गंभीर रुप समोर आला आहे. पाकिस्तानातल्या सहा वर्षीय मुलीला भारतात  वैद्यकिय मदत मिळावी यासाठी त्यानं व्हिसा मिळवून देण्यासाठी खटाटोप केली. त्यानं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना त्यासाठी पत्रही पाठवलं आणि त्यांनी गंभीरची ही मागणी मान्य केली.

ओमैमा अली असे या चिमुरडीचे नाव असून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना आता व्हिसा मिळणार आहे. ओमैमाला व्हिसा मिळावा यासाठी गंभीरनं 1 ऑक्टोबरला परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले होते. ''ओमैमा व तिच्या कुटुंबीयांना व्हिसा मिळावा यासाठी मी इस्लामाबाद उच्चायुक्तालयाकडे विचारणा करा असे जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात मी विनंती केली होती,'' असे गंभीरने सांगितले. 

पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने गंभीरकडे ही विनंती केली होती. या मुलीवर नोएडा येथील हॉस्पिटलमध्ये यापूर्वी उपचार झाले होते आणि तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी होणार होती. गंभीर म्हणाला,''युसूफनं मला त्या मुलीबद्दल सांगितले. तिला ओपन हार्ट सर्जरी करणे गरजेचे होते आणि त्यासाठी तिला व्हिसा मिळणे महत्त्वाचे होते. मी परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानतो. त्यांनी माझी विनंती मान्य करत त्या मुलीला व्हिसा दिला.''

टॅग्स :गौतम गंभीरपाकिस्तानव्हिसा