Join us  

गौतम गंभीर मैदानात पंचांवर भडकतो तेव्हा...

जर सदोष पंचगिरी पाहायला मिळाली तर खेळाडू भडकताना पाहायला मिळाले. या गोष्टीचे ताजे उदाहरण म्हणजे गौतम गंभीर.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 5:17 PM

Open in App
ठळक मुद्देगंभीर ४४ धावांवर असताना ही गोष्ट पाहायला मिळाली.सोळाव्या षटकातील पहिला चेंडू गंभीर खेळला आणि त्याला पंचांनी झेलबाद दिले. गंभीरने पंचांवर नाराजी दर्शवली. मैदानातून तावातावाने तो बाहेर पडल्याचे साऱ्यांनीच पाहिले.

नवी दिल्ली : अंतिम निर्णय हा पंचांचा असतो, असे आपण बऱ्याचदा ऐकले आहे. पण क्रिकेटच्या मैदानात डीआरएस नावाची सिस्टीम आली आणि त्यानंतर पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली जाऊ लागली. पण भारतातील स्थानिक स्पर्धांमध्ये डीआरएस वापरली जात नाही आणि त्यावेळी जर सदोष पंचगिरी पाहायला मिळाली तर खेळाडू भडकताना पाहायला मिळाले. या गोष्टीचे ताजे उदाहरण म्हणजे गौतम गंभीर.

रणजी स्पर्धेत दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या दोन संघांमध्ये सामना खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. गंभीर ४४ धावांवर असताना ही गोष्ट पाहायला मिळाली. सोळाव्या षटकातील पहिला चेंडू गंभीर खेळला आणि त्याला पंचांनी झेलबाद दिले. यानंतर जेव्हा पुन्हा एकदा हा व्हीडीओ पाहण्यात आला तेव्हा चेंडू गंभीरच्या बॅटला लागला नसल्याचे सर्वांनाच समजले. त्यावेळी गंभीरने पंचांवर नाराजी दर्शवली. मैदानातून तावातावाने तो बाहेर पडल्याचे साऱ्यांनीच पाहिले.

हा पाहा व्हिडीओ

सध्याच्या घडीला गंभीर चांगल्या फॉर्मात नाही, पण तरीही त्याला भारतीय संघात पुनरागमन करायचे आहे. यासाठी तो मोठी खेळी साकारण्याचा प्रयत्न करत आहे. या सामन्यात गंभीरला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सहा धावांची गरज होती. जर या सहा धावा झाल्या असत्या तर त्याला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करता आली असती. त्यामुळेच गंभीर पंचांवर भडकल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :गौतम गंभीररणजी करंडक