Join us  

"आज तुझ्या दिवंगत वडिलांना...", 'विराट' विक्रम अन् गंभीरच्या चारोळ्यांनी चाहत्यांची जिंकली मनं

आता टीम इंडिया चॅम्पियन होण्यापासून केवळ एक पाऊल दूर असून भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 3:22 PM

Open in App

Gautam Gambhir on Virat kohli : न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाचा दारूण पराभव करून भारतीय संघाने देशवासियांची दिवाळी गोड केली. आता टीम इंडिया चॅम्पियन होण्यापासून केवळ एक पाऊल दूर असून भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ११७ धावांची खेळी केली, कोहलीने वन डे सामन्यातील ५० वे शतक झळकावून वानखेडेवर इतिहास रचला. या शतकासह त्याने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला. विराट कोहलीने आपले ५० वे शतक पूर्ण केले तेव्हा सचिन तेंडुलकर देखील प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होता. शतक पूर्ण केल्यानंतर कोहलीने प्रथम तेंडुलकर जिथे बसला होता त्या दिशेने वाकून नमस्कार केला, त्यानंतर शतकाचा आनंद साजरा केला. किंग कोहलीच्या ५० व्या शतकाबद्दल त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने कोहलीच्या रेकॉर्डब्रेक शतकावर प्रतिक्रिया दिली आहे. गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भारतीय दिग्गजाच्या खेळीला दाद दिली.

गंभीरने म्हटले की, विराट ५० व्या शतकाबद्दल तुझे अभिनंदन... सचिनला मागे टाकणे ही विराट कोहलीची मोठी कामगिरी आहे, मला खात्री आहे की त्याच्या दिवंगत वडिलांना आज खूप अभिमान वाटत असेल आणि ते वरून आपल्या मुलाकडे पाहून हसत असतील. या पिढीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा खेळाडू म्हणजे विराट आहे.

दरम्यान, गंभीरच्या या प्रतिक्रियेलाही चाहत्यांनी पसंती दिली आहे. खरं तर कोहलीने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिले वन डे शतक झळकावले होते, तेव्हा गंभीरनेही त्या सामन्यात शतक झळकावले होते. त्यामुळे गंभीरला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला होता. मात्र, जेव्हा गंभीर हा पुरस्कार घेण्यासाठी आला तेव्हा गंभीरने कोहलीला त्याचा प्लेयर ऑफ द अवॉर्ड दिला होता. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध न्यूझीलंडगौतम गंभीरविराट कोहली