बंगळुरू, आयपीएल 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला इंडियन प्रीमिअर लीगच्या याही मोसमात अपयशाचा पाढा गिरवावा लागला. 12व्या मोसमात बंगळुरूला 13 सामन्यांत केवळ 4 विजय मिळवता आले आणि प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाणारा तो पहिलाच संघ ठरला. मोठी मोठी नावं असलेले खेळाडू संघात असूनही येणारे अपयश ही बंगळुरूसाठी चिंतेची बाब म्हणावी लागेल. त्याचा गांभीर्याने विचार केला जात असून पुढील मोसमात संघात संरचनात्मक बदल करणार असल्याचे संकेत मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी दिले आहेत. त्यांच्या बोलण्याचा रोख हा कोहलीच्या नेतृत्वाकडे असल्याचे बोलले जात आहे.
पाहा व्हिडीओ...
एक-दोन सामने खेळवून डावलल्यावर सातत्य कसे राखणार? उमेश यादव निवड समितीवर बरसलाआगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात जलद माऱ्याची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार यांच्या खांद्यावर असणार आहे. इंग्लंडच्या वातावरणात भारतीय संघात आणखी एक जलदगती गोलंदाज हवा होता असे मत अनेकांनी व्यक्त करताना उमेश यादवचे नाव सुचवले होते. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा गोलंदाज उमेशला आयपीएल स्पर्धेत अपयश आले. या अपयशाला निवड समिती जबाबदार असल्याची अप्रत्यक्ष टीका उमेशने केली आहे. भारतीय संघात निवड केल्यानंतर 1-2 सामने खेळवून डावलले जात असल्यामुळे आत्मविश्वास गमावल्याचे उमेशने सांगितले आणि त्यामुळेच कामगिरीवर परिणाम झाल्याचा दावा त्याने केला.