Join us

Ganesh Chaturthi 2018 : ऑस्ट्रेलियाचा ब्रेट गणपतीपुढे 'ली'न

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यालाही बाप्पाचे दर्शन घेण्याचा मोह आवरता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 14:02 IST

Open in App
ठळक मुद्देब्रेट याने मुंबईतील एका नामवंत मंडळाला भेट दिली आणि बाप्पाचे दर्शन घेतले.

मुंबई : गणपती बाप्पाचे भक्त फक्त भारतातच नाही, तर ते परदेशातही आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यालाही बाप्पाचे दर्शन घेण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे ब्रेट याने मुंबईतील एका नामवंत मंडळाला भेट दिली आणि बाप्पाचे दर्शन घेतले.

ब्रेट काही वर्षांपासून भारतामध्ये समालोचन करायला येत असतो. या काळात त्याने भारताची परंपरा जाणून घेतली. त्यामुळेच त्याला गणपतीचे दर्शन घेण्याचा मोह आवरता आला नाही. ब्रेटने आजचा मुहूर्त साधत मुंबईतील जीएसबी सेवा मंडळ येथे जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव