Join us  

IPL 2020: दिनेश कार्तिकवर भडकला गंभीर; सत्राच्या मध्यातच कर्णधारपद सोडल्याने नाराज

गंभीर एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला की, हे फक्त त्याची मानसिकता दाखवते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 1:47 PM

Open in App

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक याने आयपीएलच्या मध्यातच केकेआरचे कर्णधारपद सोडले. त्याच्या या निर्णयावर कोलकाताला दोन वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या गंभीर याने टिका केली आहे.

गौतम गंभीर म्हणाला की, ‘ कर्णधार पद सोडणे हे फक्त मानसिकता दाखवते. कारण दिनेशला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे होते. पण त्याने फार काही साध्य होणार नाही.’ गंभीरने त्यावर टिका करताना स्वत:चे उदाहरण देखील दिले. २०१४ च्या सत्रात गंभीरचा फॉर्म हरपला होता. मात्र कर्णधार असूनही त्याने पुन्हा फॉर्म मिळवला. आणि चांगली कामगिरी केली.

सत्राच्या मध्यात केकेआरने कार्तिक कर्णधारपदावरून दूर होत असल्याची घोषणा केली आणि नंतर ईयॉन मॉर्गनला कर्णधार बनवण्यात आले. आता केकेआर अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहे. गंभीर एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला की, हे फक्त त्याची मानसिकतादाखवते. तुला फक्त फलंदाजीवरच लक्ष केंद्रित करायचे होते.  काही वेळा हे योग्य होते. पण तुम्ही जबाबदारी घेणे महत्त्वाचे ठरते. मी स्वत: २०१४मध्ये अशाच परिस्थितीतून जात होतो. त्यावेळी तीन सामन्यात शुन्यावर देखील बाद झालो होतो. पण नंतर पुनरागमन केले मला कर्णधारपदानेच फॉर्ममध्ये येण्यास मदत केल्याचे गंभीरने सांगितले.

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सगौतम गंभीरदिनेश कार्तिकIPL 2020