Join us  

चहलच्या पत्नीचा 'तो' फोटो व्हायरल; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; चाहत्यांनी घेतली शाळा

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माच्या एका फोटोची खूप चर्चा रंगली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 12:39 PM

Open in App

Dhanashree Verma Viral Photo: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माच्या एका फोटोची खूप चर्चा रंगली आहे. धनश्री वर्मा सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अलीकडेच तिने सोनी टीव्हीच्या झलक दिख लाजा या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर रविवारी तिने आपल्याला मिळालेल्या शुभेच्छांचे किस्से इंस्टाग्रामवर शेअर केले. पण यामध्ये तिने एक असा फोटो शेअर केला ज्यावरून चाहते चहलची शाळा घेत आहेत. एका फोटोत धनश्री तिच्या कोरियोग्राफर मित्रासोबत दिसत आहे.

धनश्रीचा हा फोटो समोर येताच फोटोवरून ट्रोलर्संनी धनश्रीला लक्ष्य केले. धनश्रीचा हा फोटो ज्या व्यक्तीसोबत दिसला त्या व्यक्तीचे नाव प्रतीक उतेकर आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस आल्याचे दिसते. यामध्ये धनश्रीचा पती आणि भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहललाही लोकांनी यात ओढले. अनेकांनी चहलबद्दल सहानुभूती दाखवून त्याचे दु:ख समजून घेण्यासारख्या गोष्टी लिहायला सुरुवात केली. धनश्रीचा ज्या व्यक्तीसोबत फोटो व्हायरल होत आहे, ती व्यक्ती प्रतीक उतेकर आहे. त्याचे मलायका अरोरासह इतर सेलिब्रिटींसोबतही फोटो आहेत. 

धनश्री वर्माचा एक फोटो अन् मीम्सचा पाऊस

दरम्यान, भारतीय संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा (rajasthan royals) प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो. चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने एक कोरियोग्राफर आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या धनश्री आणि युझवेंद्र यांची प्रेमकहाणी फारच रंगतदार आहे. अलीकडेच चहलने दिलेल्या एका मुलाखतीत यातील काही मजेशीर किस्से सांगितले होते. आपल्या डान्स स्टेप्स आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात असणारी धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. नृत्यकला शिकताना युझी आणि धनश्री या दोघांचा संवाद वाढला आणि डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले.

टॅग्स :युजवेंद्र चहलभारतीय क्रिकेट संघसोशल व्हायरलमिम्सऑफ द फिल्ड