Join us

बांगलादेशचे फिल्डर पाकिस्तानपेक्षा अतरंगी निघाले; ३ खेळाडू कॅच पकडण्यात फेल झाले, Video

पाकिस्तानी खेळाडूंच्या क्षेत्ररक्षकांची फजिती वारंवार पाहायला मिळते. पण, त्यांना लाजवतील असे क्षेत्ररक्षण बांगलादेशच्या खेळाडूंकडून पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 15:29 IST

Open in App

Bangladesh and Sri Lanka 2nd Test : पाकिस्तानी खेळाडूंच्या क्षेत्ररक्षकांची फजिती वारंवार पाहायला मिळते. पण, त्यांना लाजवतील असे क्षेत्ररक्षण बांगलादेशच्या खेळाडूंकडून पाहायला मिळाले. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशच्या तीन खेळाडूंना मिळूनही झेल टीपता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ८ बाद ५१२ धावा उभ्या केल्या आहेत आणि प्रभात जयसूरियाचा झेल बांगलादेशच्या खेळाडूंनी टाकला. १२१ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हा मजेशीर प्रकार पाहायला मिळाला.

श्रीलंकेच्या निशान मदुश्का ( ५७), दिमुथ करुणारत्ने ( ८६), कुसल मेंडीस ( ९३), दिनेश चंडीमल ( ५९), कर्णधार धनंजया डी सिल्वा ( ७०) यांनी दमदार कामगिरी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. ६ बाद ४१९ धावांवर जयसूरियाचा झेल बांगलादेशच्या खेळाडूंनी टाकला. खालेद अहमदच्या गोलंदाजीवर जयसूरियाचा झेल स्लीपच्या दिशेने उडाला आणि पहिल्या स्लीपच्या खेळाडूच्या दिशेने गेला. त्याच्या हातातून चेंडू निसटला मग दुसऱ्या स्लीपमधील खेळाडू तो टिपण्यासाठी गेला. त्याच्याकडूनही चूक झाली आणि तिसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूला डाईव्ह मारावी लागली. पण, चेंडू काही त्याच्या हाती आला नाही. 

टॅग्स :बांगलादेशश्रीलंका