वेलिंग्टन : १४ जुलै २०१९ ला लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडकडून एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचूूूूूी आठवण होताच पश्चात्ताप होतो. चौकार मोजण्याच्या नियमाच्या आधारे इंग्लंडच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्याआधी निर्धारित षटके आणि सुपरओव्हरमध्येही सामना ‘टाय’ झाला होता. त्या पराभवाबाबत कटुता नसली तरी पश्चात्ताप होत असल्याचे मत न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी व्यक्त केले. ‘सामन्याआधी नियमांची माहिती असल्याने आमच्या मनात पराभवाची कटुता नाही. मात्र वेळोवेळी थोडी खंत वाटते. न्यूझीलंडमधील प्रत्येक चाहत्याच्या मनात हेच भाव व्यक्त होतात,’ असे स्टीड यांनी सांगितले.
न्यूझीलंडच्या खेळाडूंचा सराव सुरू
कोरोनामुळे मार्चपासून घरच्या घरी असलेल्या न्यूझीलंडच्या पुरुष आणि महिला संघातील आघाडीच्या खेळाडूंनी लिंकनमध्ये सोमवारी सराव सुरू केला. सप्टेंबरपर्यंत एकूण सहा राष्टÑीय शिबिरांचे आयोजन होणार आहे. दुसरे शिबिर १९ जुलैपासून माऊंट मॉनगानुई येथे सुरू होईल. सोमवारच्या सरावात टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, मॅट हेन्री आणि डेरिल मिचेल सहभागी झाले.